IND vs SL: श्रीलंकेला नमवताच टीम इंडिया बनली ‘नंबर 1’, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला एकदिवसीय सामना भारताने 7 विकेट्सनी जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

IND vs SL: श्रीलंकेला नमवताच टीम इंडिया बनली 'नंबर 1', पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी बरोबरी
Team India
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 3:04 PM

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत एका दगडांत दोन पक्षी मारले आहेत. कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) श्रीलंका (Sri Lanka) मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. यासोबतच भारतीय संघ ‘नंबर 1’ बनला आहे. पण हा क्रमांक भारताने ICC रँकिंगमध्ये नाही तर एका वेगळ्याच रेकॉर्डमध्ये मिळवला आहे. भारतीय संघ एकाच विरोधी संघासोबत सर्वाधिक वेळा विजय मिळवणाऱ्या संघाच्या पंगतीत बसला आहे.

कोलंबोमधील पहिल्या सामन्यातील विजयासोबत भारताने श्रीलंकेविरुद्ध  160 वा वनडे सामना खेळत 92 वा विजय मिळवला. भारतीय संघाने एकाच प्रतिस्पर्ध्याविरोधात मिळवलेल्या विजयांची सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच भारताने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघासोबत 138 वनडेमध्ये 92 वेळा विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने देखील श्रीलंका संघाविरुद्धच 92 सामन्यात विजय मिळवला आहे.

‘या’ बाबतीत पाकिस्तान पुढे

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघानी सर्वाधिक वेळा श्रीलंका संघाविरोधातच विजय मिळवला आहे. मात्र भारताला हे 92 विजय मिळवण्यासाठी 160 सामने खेळावे लागले. तर पाकिस्तानने भारतापेक्षा 5 वनडे कमी म्हणजेच 155 वनडे खेळत हे विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध 61 वनडेमध्ये विजय मिळवला आहे.

सचिननंतर धवनने केली कमाल

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच कर्णधार असणाऱ्या शिखरने कर्णधार म्हणून सलामीच्या सामन्यात 86 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात केलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्कोर आहे. याआधी 1996 मध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधार म्हणून डेब्यू करताना 110 रन ठोकले होते.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(After winning Match against Sri Lanka Team India Equal the record of Pakistan and Australia in Most ODI wins Against Same Team)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.