GT vs CSK IPL 2023 Final : कप जिंकायचा असेल, तर पहिला तिघांचा बंदोबस्त कर, सचिन तेंडुलकरचा धोनीला सल्ला

GT vs CSK IPL 2023 Final : धोनीच्या पाचव्यांदा कप जिंकण्याच्या मार्गात हे तिघेच अडथळा बनतील. सचिनने आपल्या टि्वटमध्ये शुभमन गिलच भरभरुन कौतुक केलय. गिलच्या मुंबई विरुद्ध शतकी खेळीत काय आवडलं? ते सुद्धा सांगितलय.

GT vs CSK IPL 2023 Final : कप जिंकायचा असेल, तर पहिला तिघांचा बंदोबस्त कर, सचिन तेंडुलकरचा धोनीला सल्ला
GT vs CSK IPL 2023Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 6:19 PM

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज IPL 2023 ची फायनल खेळली जाणार आहे. या मॅचमध्ये विद्यमान चॅम्पियन आणि यजमान गुजरात टायटसन्ससमोर चेन्नई सुपर किंग्सच आव्हान असणार आहे. गुजरातने मागच्या सीजनमध्ये आयपीएल डेब्यु केला होता. किताब जिंकण्यात ते यशस्वी ठरले होते. या सीजनमध्ये सुद्धा ही टीम शानदार फॉर्ममध्ये आहे. फायनलमध्ये गुजरात विरुद्ध सीएसके अटी-तटीचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे. या मॅचआधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने गुजरातवर विजय मिळवण्यासाठी CSK ला महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

सचिनने या मॅचआधी एक मोठं टि्वट केलय. त्यात त्याने गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलच कौतुक केलय. त्याचवेळी चेन्नईला जिंकायच असेल, तर तीन फलंदाजांना लवकर आऊट कराव लागेल, असं म्हटलय.

गुजरातचे ते धोकादायक खेळाडू कोण?

गुजरात एक शानदार टीम आहे, असं सचिन तेंडुलकरने म्हटलय. चेन्नईसाठी शुभमन गिल, डेविड मिलर आणि हार्दिक पांड्याची विकेट महत्वाची असणार आहे. चेन्नईला ट्रॉफी जिंकण्यासाठी, या तिघांना लवकर आऊट करण आवश्यक आहे. गिल या सीजनमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. तीन शतकांच्या मदतीने त्याने 851 धावा केल्या आहेत. डेविड मिलरकडे फिनिशिंगची क्षमता आहे. हार्दिक पांड्या सुद्धा तसाच आहे.

सचिनने काय सांगितलं?

सचिनने चेन्नईच्या फलंदाजीच सुद्धा कौतुक केलय. एमएस धोनी आठव्या नंबरवर बॅटिंगसाठी येतो. त्यामुळे या टीमची फलंदाजी खोलवर आहे. सचिनच्या मते, फायनलमध्ये दोन्ही टीम्सच्या बॅटिंगचा सामना असेल. ज्या टीमची फलंदाजी कमकुवत होईल, त्यांचा पराभव होईल.

सचिनकडून शुभमन गिलच भरभरुन कौतुक

क्वालिफायर-2 मध्ये शुभमन गिल मुंबई इंडियन्स विरुद्ध जी इनिंग खेळला, त्याच सचिनने तोंडभरुन कौतुक केलं. गिलने मुंबई विरुद्ध शतकी खेळी केली. ज्यामुळे गुजरात टायटन्सने आरामात फायनलमध्ये प्रवेश केला. गिलच कौतुक करताना सचिनने टि्वटमध्ये लिहिलय की, गिलने या सीजनमध्ये शानदार खेळ दाखवला. त्याच्या दोन शतकांचा दमदार इम्पॅक्ट आहे. गिलच्या मुंबई विरुद्ध शतकी खेळीत काय आवडलं? ते सुद्धा सचिनने सांगितलय. त्या इनिंगमध्ये गिलच टेम्परामेंट, शांततापूर्वक फलंदाजी आणि धावांची भूक दिसली. त्याशिवाय एकेरी-दुहेरी धावा पळून काढण्याने प्रभावति केलं, असं सचिनने म्हटलय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.