AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : चेन्नईकडून मोठा गेम, मुंबईच्या माजी खेळाडूला आयुष म्हात्रेच्या जागी संधी, कोण आहे तो?

Ayush Mhatre Replacement : आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याने आधीच अडचणीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला होता. तेव्हापासून आयुषच्या जागी कुणाला संधी मिळणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा होती.

MI vs CSK : चेन्नईकडून मोठा गेम, मुंबईच्या माजी खेळाडूला आयुष म्हात्रेच्या जागी संधी, कोण आहे तो?
Ayush Mhatre Csk IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 23, 2026 | 5:21 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आज 23 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणआर आहेत. उभयसंघातील सामन्याला थोड्याच वेळात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सूकता चाहत्यांना असते तितकीच प्रतिक्षा आयपीएल स्पर्धेत चेन्नई-मुंबई मॅचची असते. यावरुन या सामन्याची क्रेझ लक्षात येते. सामन्याला अवघे काही तास बाकी असताना आता चेन्नईच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नईने युवा फलंदाज आयुष म्हात्रे याच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे.

आकाश मढवाल याचा समावेश

चेन्नई टीमने आयुषच्या जागी टीममध्ये आकाश मढवाल याचा समावेश केला आहे. आकाश वेगवान गोलंदाज आहे. मात्र फलंदाजाच्या जागी फलंदाजाला संधी न दिलेल्या क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र चेन्नईत बरेच फलंदाज आहेत. त्यामुळे फलंदाजाऐवजी गोलंदाजाला आयुषच्या जागी संधी दिल्याचं म्हटलं जात आहे. आकाश आयपीएल स्पर्धेत आधी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यामुळे यलो आर्मी आकाशला पलटण विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयुषला काय झालं?

आयुषला सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात बॅटिंग करताना हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. आयुषला या दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं. तेव्हापासून चाहत्यांना आयुष म्हात्रे याच्या जागी कुणाला संधी दिली जाणार? याची प्रतिक्षा होती, अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.

आकाश मढवालबाबत थोडक्यात पण महत्वाचं

आकाश उजव्या हाताने बॉलिंग करतो. आकाशने याआधी आयपीएल स्पर्धेत 2 संघांचं प्रतिनिधित्व केलंय. आकाश 2 मोसमात मुंबई इंडियन्सचं तर एका हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. आकाश 2023 आणि 2024 साली मुंबईसाठी खेळला होता. तर आकाश गेल्या मोसमात (IPL 2025) राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.

आयुषच्या जागी आकाशचा समावेश, चेन्नईची घोषणा

आकाशने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 17 सामन्यानंत एकूण 23 विकेट्स मिळवल्या आहेत. आकाशने 2023 साली एलिमिनेटर सामन्यात आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. आकाशने त्या सामन्यात 3.3 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेत आपली छाप सोडली होती. त्यामुळे हाच मुंबईचाच माजी खेळाडू आता चेन्नईकडून खेळताना पलटण विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल