AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप जेतेपदानंतर आता आशियाई खेळांवर नजर! वुमन्स इंडिया पुन्हा सुवर्ण पटकावणार; कसं काय ते जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेत जेतेपद मिळवल्यानंर भारतीय महिला संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याला कारणंही तसंच आहे. भारताला यासाठी तीन विजय मिळवायचं आहेत.

आशिया कप जेतेपदानंतर आता आशियाई खेळांवर नजर! वुमन्स इंडिया पुन्हा सुवर्ण पटकावणार; कसं काय ते जाणून घ्या
आशिया कप जेतेपदानंतर आता आशियाई खेळांवर नजर! वुमन्स इंडिया पुन्हा सुवर्ण पटकावणार; कसं काय ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 16, 2026 | 5:18 PM
Share

जपानमध्ये आयोजित आशियाई खेळ 2026 मधील महिला क्रिकेटचा थरार 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा अंतिम सामना 22 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. नुकताच आशिया कप स्पर्धेत एकही सामना न गमावता दणदणीत जेतेपद मिळवणारा भारतीय महिला क्रिकेट संघ या स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ म्हणून प्रवेश करेल. आशिया कपमधील या ऐतिहासिक कामगिरीमुळे हरमनप्रीत कौरच्या गँगचा आत्मविश्वास दुणावला असून, टीम इंडिया पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. आशियाई क्रिकेटमधील अव्वल कामगिरीच्या जोरावर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या 4 प्रमुख संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. भारताने 2023 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आता गतविजेता भारतीय संघ या हंगामातील आपला पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी यजमान जपानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी दोन्ही उपांत्य सामने होतील, तर 22 सप्टेंबर रोजी कांस्यपदक आणि सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने खेळवले जातील.

भारतीय संघ सुवर्णपदकाचा दावेदार

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघात फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंचा उत्तम ताळमेळ आहे. भारताची सलामीची जोडी शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना सध्या त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. पॉवरप्लेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच तुटून पडत संघाला स्फोटक सुरुवात करून देण्याची या दोन्ही सलामीवीरांची आक्रमक शैली भारतासाठी सर्वात मोठी जमेची बाजू ठरत आहे. गोलंदाजीतही भारताचे पारडे अत्यंत जड आहे. अनुभवी अष्टपलू दीप्ती शर्मा आणि हुकमी फिरकीपटू श्री चरणी यांनी आपल्या फिरकीच्या जादुई माऱ्याने गेल्या काही सामन्यांत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026: महिला क्रिकेटचे संपूर्ण वेळापत्रक

  • 17 सप्टेंबर 2026 – बांगलादेश विरुद्ध चीन, उपांत्यपूर्व फेरी 1, सकाळी 5:30 वाजता
  • 17 सप्टेंबर 2026 – पाकिस्तान विरुद्ध थायलंड, उपांत्यपूर्व फेरी 2, सकाळी 10:30 वाजता
  • 18 सप्टेंबर 2026 – श्रीलंका विरुद्ध मलेशिया, उपांत्यपूर्व फेरी 3, सकाळी 5:30 वाजता
  • 18 सप्टेंबर 2026 – भारत विरुद्ध जपान, उपांत्यपूर्व फेरी 4, सकाळी 10:30 वाजता
  • 20 सप्टेंबर 2026 – पहिली उपांत्य फेरी (Semi Final 1), सकाळी 5:30 वाजता
  • 20 सप्टेंबर 2026 – दुसरी उपांत्य फेरी (Semi Final 2), सकाळी 10:30 वाजता
  • 22 सप्टेंबर 2026 – कांस्यपदक सामना (Third-place Playoff), सकाळी 5:30 वाजता
  • 22 सप्टेंबर 2026 – सुवर्णपदक सामना (GRAND FINAL), सकाळी 10:30 वाजता

महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा शर्मा, आणि नंदनी शर्मा.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?