AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनाया बांगर On Fire..! एका षटकात अशी केली फटकेबाजी, फलंदाजीचा Video पाहा

अनाया बांगरने लिंग बदल केला असला तरी तिचं क्रिकेटवरील प्रेम काही कमी झालेलं नाही. मुलगी झाल्यानंतरही ती क्रिकेटचे धडे गिरवत आहे. अगदी पूर्वीसारखीच फलंदाजी करताना दिसत आहे. अनाया बांगरने फलंदाजी करत व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने जोरदार फटकेबाजी केली.

अनाया बांगर On Fire..! एका षटकात अशी केली फटकेबाजी, फलंदाजीचा Video पाहा
अनाया बांगर On Fire..! एका षटकात अशी केली फटकेबाजी, फलंदाजीचा Video पाहा Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2025 | 5:19 PM
Share

अनाया बांगरचं क्रिकेट प्रेम काही कमी झालेलं नाही. लिंग बदल केल्यानंतर मुलापासून मुलगी झाली. असं असलं तरी क्रिकेटचं बाळकडू तिला घरातून मिळालं आहे. वडील संजय बांगर हे क्रिकेटपटू होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. त्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचं मोलाचं सहकार्यही नोंदवलं आहे. त्यामुळे अनायाला क्रिकेट खेळण्याची आवड लहानपणापासून आहे. असं असताना लिंग बदल केल्यानंतर अनायाने पुन्हा एकदा बॅट हाती घेतली आहे. तसेच आपल्या शैलीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. अनाया बांगर डावखुरी असून फलंदाजीचं स्किल दाखवलं. याबाबतचा व्हिडीओ अनाया बांगरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अनाया बांगरने तिचं फलंदाजीचं कौशल्य तिच्या प्रॅक्टिस एरियात दाखवलं. यात तिने एकूण 7 चेंडूंचा सामना केला आणि सहा चेंडूंना योग्य त्या दिशेने फटकावलं. अनाया बांगरने कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आणि पूल शॉट्स मारले.

अनाया बांगरने फलंदाजीच्या माध्यमातून मैदानात परतण्यास तयार असल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच या व्हिडीओवर एक पोस्ट लिहिली की, जास्त काळ वाट पाहू शकत नाही. लवकर बरं होऊन नेटमध्ये परण्याची इच्छा आहे. या व्हिडीओ अनाया बांगरला क्रिकेटचं किती वेड आहे ते दाखवते. महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा आहे. यासाठी आयसीसीकडे मागणीही केली आहे. पण परवानगी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. महिला क्रिकेट खेळणाऱ्या ट्रान्स महिलांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लादलेल्या बंदीला अनायाचा विरोध आहे. अनाया सध्या मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनाया बांगरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने स्पष्ट की, तिचा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तिचा मुलगा ते मुलगी असा प्रवासाचा उलगडा केला जाईल. अनाया बांगरने मुलापासून मुलगी होण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली. यासाठी तिने ब्रिटनमध्ये गेली होती. ही प्रक्रिया सुरु असताना पहिल्या तीन महिन्यांत ती पुरुषांच्या क्रिकेट क्लबमध्ये खेळायची.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.