IPL 2023 : Arjun Tendulkar ला संधी दिल्यामुळे Mumbai Indians च नुकसान, प्रसिद्ध क्रिकेटपटूच वादग्रस्त वक्तव्य
IPL 2023 : या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होऊ शकतो. अर्जुन तेंडुलकरमुळे मुंबई इंडियन्सच नुकसान कसं होतय? अर्जुन तेंडुलकर चांगली गोलंदाजी करतो, मग तरीही नुकसान कसं? प्रसिद्ध कॉमेंटेटरला नक्की काय म्हणायचय?

IPL 2023 Arjun Tendulkar : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू सीजनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची चर्चा आहे. त्याने चांगली कामगिरी करुन लक्षवेधून घेतलय. अर्जुन मुंबई इंडियन्सकडून ओपनिंग स्पेलमध्ये बॉलिंग करतोय. महत्वाच म्हणजे पावरप्लेमध्ये त्याची गोलंदाजी सुद्धा यशस्वी ठरतेय. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सामना झाला. या मॅचमध्ये त्याने वृद्धीमान साहाच्या रुपाने मुंबईला पहिली महत्वाची विकेट मिळवून दिली.
अर्जुनने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये वृद्धीमान साहाचा विकेट घेतला. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अर्जुन तेंडुलकर एक धोकादायक गोलंदाज आहे. कारण त्याच्याकडे उत्तम स्विंग आहे. रोहित शर्माने काल डेथ ओव्हर्समध्ये अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी दिली नाही. अर्जुनने त्याच्या 2 ओव्हरमध्ये 9 रन्स देऊन 1 विकेट घेतला.
पारडं कधी गुजरातच्या बाजूने झुकलं?
मुंबई इंडियन्सला काल जोफ्रा आर्चरची उणीव जाणवली. मुंबई इंडियन्सने लास्ट चार ओव्हर्समध्ये 70 धावा दिल्या. तिथेच पारड गुजरात टायटन्सच्या बाजूने झुकलं होतं.
अर्जुनला संधी देण्यावर मत काय?
मुंबई इंडियन्सच्या साइडमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या रोलबद्दल न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सायमन डुलने त्याचे विचार व्यक्त केले आहेत. त्यावरुन वाद होऊ शकतो. “तुम्ही एका खराब सामन्यामुळे अर्जुन तेंडुलकरला बाहेर बसवू शकत नाही. त्याने चांगली कामगिरी केलीय. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, रोहितला सुद्धा हे माहितीय, अर्जुन तेंडुलकर डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करु शकत नाही. तो शेवटच्या चार-पाच ओव्हरमध्ये बॉलिंग करेल, असा गोलंदाज नाहीय. पण रोहितने त्याला संधी दिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली” असं डुल क्रिकबझशी बोलताना म्हणाला. अर्जुन तेंडुलकर कधी उपयुक्त गोलंदाज?
अर्जुन तेंडुलकरने मागच्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात महागडी गोलंदाजी केली होती. त्याने पावरप्लेमध्ये चांगली बॉलिंग केली. पण त्यानंतर एका ओव्हरमध्ये 31 धावा लुटवल्या. ज्याची किंमत मुंबई इंडियन्सला चुकवावी लागली. “माझ्या मते अर्जुन तेंडुलतर ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरसारखा बॉलर आहे. चेंडू स्विंग होत असताना पहिले दोन-तीन ओव्हर हे चांगले गोलंदाज आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत. डावाच्या अखेरीस गोलंदाजी करण्याचा अर्जुनकडे अनुभव नाहीय” असं डुलच मत आहे.
