AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाचपट पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणार

आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला अजून प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण पुढच्या काही सामन्यात ही संधी मिळू शकते. असं असताना अर्जुन तेंडुलकरवर एका फ्रेंचायझीने मोठा डाव लावला आहे. तसेच त्याच्यासाठी पाचपट पैसै मोजले आहेत.

आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाचपट पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणार
आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाच पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणारImage Credit source: PTI
| Updated on: May 02, 2026 | 6:35 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याला आयपीएल स्पर्धेतील या पर्वात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म कसा हे सांगणं कठीण आहे. पण स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडून त्याला संघात घेतलं आहे. सध्या लखनौ सुपर जायंट्स संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्याला पुढच्या काही सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्याची पारख करणं फ्रेंचायझीला सोपं जाईल. असं असताना अर्जुन तेंडुलकरला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबई टी20 स्पर्धेचा लिलाव पार पडला. यात अर्जुन तेंडुलकरसाठी जोरदार बोली लागली. अखेर आर्क्स अंधेरी संघाने मोठी बोली लावत त्याला संघात घेतलं. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर मुंबई टी20 स्पर्धेत आर्क्स अंधेरी संघाकडून खेळताना दिसणार आहे.

खरं तर अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. त्यामुळे त्याला मुंबई टी20 स्पर्धेत खेळण्यासाठी खास परवानगी मिळाली आहे. कारण या स्पर्धेत फक्त मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाते. असं असताना अर्जुन तेंडुलकरला मुंबई टी20 स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी20 लीगसाठी 2 मे रोजी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही उतरला होता. त्यामुळे त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. अखेल लिलावार आर्क्स अंधेरीने अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर 10 लाखांची बोली लावली आणि संघात घेतलं. त्याच्या मूळ किंमतीच्या पाचपट रक्कम त्याला मिळाली. अर्जुन तेंडुलकर 2 लाखांच्या मूळ किमतीसह लिलालावत उतरला होता.

26 वर्षीय अर्जुन तेंडुलकर आता या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. अर्जुन तेंडुलकरसह आर्क्स अंधेरीने युवा स्टार फलंदाज मुशीर खानलाही संघात घेतलं आहे. त्याच्यासाठी 11 लाखांची किंमत मोजली. तर प्रसाद पवारसाठी 11.50 लाख मोजले. या फ्रेंचायझीने स्टार खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन अष्टपैली शिवम दुबेला 20 लाख रुपयात रिटेन केलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल