AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या सरावादरम्यान WWE, प्रशिक्षकाला दोन खेळाडूंनी जमिनीवर लोळवलं Watch Video

कसोटी मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. दुसरा कसोटी सामना एजबेस्टन क्रिकेट मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सराव शिबिरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दोन खेळाडू कोचसोबत लढताना दिसत आहे.

टीम इंडियाच्या सरावादरम्यान WWE, प्रशिक्षकाला दोन खेळाडूंनी जमिनीवर लोळवलं Watch Video
टीम इंडियाच्या सरावादरम्यान WWE, प्रशिक्षकाला दोन खेळाडूंनी जमिनीवर लोळवलं Watch VideoImage Credit source: X
| Updated on: Jun 28, 2025 | 9:26 PM
Share

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात चांगल्या धावा करून सामना गमवण्याची वेळ आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅकचं आव्हान असणार आहे. हा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्याने बर्मिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट मैदानात होणार आहे. या सामन्यात कमबॅक करत मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. यासाटी टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करत आहे. प्लेइंग 11 मध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सराव शिबिरात इंग्लंडचं आव्हान मोडून काढण्यासाठी गोलंदाज आपल्या कौशल्यात भर घालण्याची तयारी करत आहे. पण असं असताना एक वेगळंच चित्र सराव शिबिरात पाहायला मिळालं. यात गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांनी गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलसोबत रेसलिंग केली. थट्टा मस्करी करत असल्याचं यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे काही गंभीर प्रकरण नाही.

गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्कल आणि खेळाडूंमध्ये खेळीमेळीचं वातावरण असल्याचं दिसत आहे. तिघांनी या क्षणाचा पुरेपूर आनंद लुटला. त्यांचा जे काही घडलं ते सर्व कॅमेऱ्यात चित्रित झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोर्ने मोर्केल पहिल्यांदा अर्शदीप सिंगसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्यानंतर दोघं रिलॅक्स होतात. मग काय अर्शदीप सिंग बाजूला बसलेल्या आकाशदीपच्या मदतीने मोर्ने मोर्कलला जमीनवर लोळवतात. त्यानंतर मोर्ने मोर्केल आणि अर्शदीप सिंह पुन्हा एकदा मस्ती करताना दिसतात.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. तर आकाश दीपला संधी मिळेल की नाही ते काही सांगता येत नाही. दरम्यान, एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात पदरी निराशा पडली आहे. इंग्लंडने सात सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं खूपच कठीण असल्याचं दिसत आहे.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.