AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय शाह ICCचे अध्यक्ष होताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिले मोठे आव्हान

Jay shah icc President : जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला पाकिस्तानात आणण्याची विनंती केली.

जय शाह ICCचे अध्यक्ष होताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिले मोठे आव्हान
| Updated on: Aug 29, 2024 | 7:51 PM
Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनले असून आता त्यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली आहे. जय शाह यांच्यापुढे आता क्रिकेटला आणखी पुढे घेऊन जाण्याचं आव्हान असेल. मात्र त्यासाठी त्याच्या मार्गात अनेक अडथळे येणार आहेत. आता जय शहा आयसीसीचे अध्यक्ष बनताच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू युनूस खानने त्यांना एक नवीन आव्हान दिले आहे. ते म्हणाले की,  पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचा सहभाग सुनिश्चित करण्यास आणि खरी खेळाची भावना दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.

जय शहा यांच्यावर मोठी जबाबदारी

जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास पाकिस्तानचा माजी फलंदाज युनूस खान याने व्यक्त केला आहे. जय शाह यांच्या प्रभावामुळे भारताला पाकिस्तानात येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, ज्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारतीलच, शिवाय खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये सद्भावनेची देवाणघेवाण होईल, यावर त्यांनी भर दिला. क्रिकेट पाकिस्तानने युनूस खानच्या हवाल्याने म्हटले आहे की जय शाह आयसीसीचे प्रमुख झाल्यानंतर क्रिकेट नक्कीच वाढले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवण्याची गरज आहे, जेणेकरून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊ शकेल आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानलाही भारताचा दौरा करता येईल.

युनूस खानने पाकिस्तान संघाच्या सध्याच्या कामगिरीबद्दल आणि बांगलादेशविरुद्धच्या 10 विकेट्सच्या पराभवावरही सांगितले की, आमच्या संघाला नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. या पराभवानंतर आता शान मसूदच्या संघाने धैर्य दाखवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. युनूस म्हणाला की, घरच्या परिस्थितीत क्रिकेट खेळण्याचे दडपण नेहमीच असते. खेळाडू दडपण हाताळू शकत नसतील तर त्यांचा उपयोग काय? खेळाडूंना त्यांचे मनोबल वाढवण्याची नितांत गरज आहे. खेळपट्टी वेगवान होती की संथ होती हे सर्वांनी पाहिले आहे. आम्ही अशा वेळी जिंकलो जेव्हा देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नव्हते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.