
आशिया कप 2025 मध्ये (Asia cup 2025) भारताने तिसऱ्यांदा पाकड्यांना धूळ चारली. भारताकडून सलग तिसऱ्यांदा सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या डोक्यावर परिणाम झाला. Operation Sindoor मध्ये भारताने पाकिस्तानसह पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आणि ते नष्ट केले. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले. त्या दहशतवाद्यांचा पुळका आता पाक संघाला आला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने पाक संघ सामना शुल्क हे ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांना दान करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता हा पैसा थेट दहशतवाद्यांच्या घरात जाणार हे स्पष्ट आहे.
सूर्याची कॉपी करायला गेला नि ट्रोल झाला
आशिया चषक 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संपूर्ण सामना शुल्क भारतीय लष्कराला आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर सूर्याने याविषयीची माहिती दिली. त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचीच कॉपी, नक्कल करण्याचा प्रयत्न सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. पण त्यांची पाक लष्कराला आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना जाणार आहे. त्याच्या या निर्णयावर जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून टीका होत आहे. अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी तर सलमानच्या या निर्णयावर ट्रोलचा धडका लावला आहे. दहशतवाद हाच पाकिस्तानचा खरा चेहरा असल्याची टीका होत आहे. भारतीय चाहते आणि पाकिस्तानी यांच्यात सोशल मीडियावर वॉर सुरू आहे.
सलमानची मुक्ताफळं
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) मुख्य आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) संचालक मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली. इतकेच नाही तर नकवी ट्रॉफी घेऊन पळाल्याने हा मंत्री चांगलाच ट्रोल झाला. पाकिस्तानची इज्जत गेली.
तर दुसरीकडे पाक कर्णधार सलमान अली आगा याने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानविषयी भारतीय संघाची वर्तवणूक अत्यंत निराश करणार असल्याचे वक्तव्य केले. भारतीय संघाने आमच्याशी हस्तांदोलन केले नाही. त्यांनी क्रिकेटचा अनादर केला. चांगला संघ कधी असं वागत नाही. भारतीय संघानं जे केलं, तसं त्यांनी करायला नको होतं, असं दुःखही त्यानं उगळलं. मला त्यांच्यासाठी कठोर शब्द वापरायचे नाहीत. पण भारतीय संघाची वर्तवणूक अनादर करणारी होती असं सलमान म्हणाला.
जगाला सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी सलमानची भूमिका उघडी पडली आहे. एकीकडे ज्ञानाचे, उपदेशाचे डोस द्यायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवायची ही पाकड्यांची खोड या संघातही असल्याचे दिसले. त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याच खेळाडूला भारतातील कोणत्याही कार्यक्रमात स्थान देऊन नका अशी मागणी करण्यात येत आहे.