
टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गतविजेता टीम इंडियाने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती विरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएईचा 9 विकेट्सने मात केली आहे. भारताने हा सामना अवघ्या 27 चेंडूंमध्ये संपवला. यूएईने भारतासमोर 58 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं. भारताने विजयासाठी मिळालेलं 58 धावांचं आव्हान अभिषेक शर्मा याच्या फटकेबाजीच्या जोरावर झटपट पूर्ण केलं. भारताने 4.3 ओव्हरमध्येच ही मॅच संपवली. अभिषेक शर्मा याने 30 धावा केल्या. अभिषेक 30 धावा करुन बाद झाला. तर त्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधार या जोडीने 10 धावा करुन भारताला विजयी केलं.
अभिषेक आणि शुबमन या दोघांनाी 48 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक आऊट झाला. अभिषेकनंतर कर्णधार शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी उर्वरित धावा जोडल्या आणि या स्पर्धेतील पहिलावहिला विजय मिळवला. भारताने या विजयासह ए ग्रुपमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. भारताचा या माहिमेतील दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताने 58 धावांचं आव्हान 1 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 4.3 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या. भारतासाठी अभिषेक शर्मा याने 30 धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांनीही भारताच्या विजयात योगदान दिलं.
टीम इंडियाने स्फोटक सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 58 धावांचा पाठलाग करताना 48 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मा 30 धावा करुन आऊट झाला आहे.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 58 धावांचा पाठलाग करताना स्फोटक सुरुवात केली आहे. भारताने 2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 25 धावा केल्या आहेत. शुबमन 13 आणि अभिषेक 11 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. यूएईने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 58 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडून उपकर्मधार शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. ही स्फोटक जोडी 58 धावा किती ओव्हरमध्ये पूर्ण करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारतीय गोलंदाजांनी जोरदार बॉलिंगच्या जोरावर यूएईला अवघ्या 57 धावांवर गुंडाळलं आहे. यूएईच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला आता विजयासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. भारतीय फलंदाज हे आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचा ऑलरांउडर शिवम दुबे याने यूएईला सहावा झटका देत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली आहे. शिवमने आसिफ खान याला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. आसिफने 7 चेंडूत 2 धावा केल्या.
टीम इंडियाचा चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याने यूएईच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं आहे. कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये यूएईच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यूएईचा अर्धा संघ तंबूूत पोहचला आहे. कुलदीपने नवव्या ओव्हरमधील पहिल्या चौथ्या आणि सहाव्या बॉलवर अनुक्रमे राहुल चोप्रा, मुहम्मद वसीम आणि हर्षित कौशिक या तिघांना बाद केलं. त्यामुळे यूएईची स्थिती 9 ओव्हरनंतर 5 आऊट 50 अशी झाली आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर यूएईची घसरगुंडी झाली आहे. भारतीय संघाने यूएईला तिसरा झटका दिला आहे. बुमराह, वरुण चक्रवर्ती याच्यानंतर कुलदीप यादव याने पहिली विकेट मिळवली आहे. कुलदीपने राहुल चोप्रा याला शुबमन गिल याच्या हाती कॅच आऊट केलं. राहुलने 7 चेंडूत 3 धावा केल्या.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने यूएईला दुसरा झटका देत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली आहे. बुमराहने यूएईला चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. त्यानंतर वरुणने पाचव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर मुहम्मद झोहेब कुलदीप यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. झोहेबने 5 बॉलमध्ये 2 रन्स केल्या.
टीम इंडियाने यूएईला चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. जसप्रीत बुमराहने चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर आलिशान शराफू याला कडक यॉर्कर टाकत क्लिन बोल्ड केलं. शराफूने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र बुमराहने योग्य वेळेस शराफूच्या खेळीला ब्रेक लावला. शराफूने 17 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 22 रन्स केल्या.
टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून यूएईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. यूएईकडून अलिशान सराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम ही सलामी जोडी बॅटिंगसाठी आली आहे.
आशिया कप स्पर्धेत भारताने नाणेफेकीची कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. छान ताजी खेळपट्टी दिसतेय. आजही दमट आहे, नंतर दव पडू शकते. संधी मिळाली तर आपण काहीही करू शकतो पण आज आपल्याला गोलंदाजी करायची आहे. आपण येथे लवकर आलो, 3-4 चांगले सराव सत्र केले आणि एक दिवस सुट्टीही घेतली.
संयुक्त अरब अमिराती (प्लेइंग इलेव्हन): मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहीद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
यूएई विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला आहे. भारताने हा एकमेव सामना जिंकला आहे. भारताने त्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडिया यूएई विरुद्ध दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.
मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, अर्यांश शर्मा (विकेटकीपर), हैदर अली, हर्षित कौशिक, जुनेद सिद्धीकी, आसिफ खान, ध्रुव पराशर, इथान डीसोझा, मतिउल्लाह खान, मोहम्मद फारूक, राहुल चोपडा (विकेटकीपर), रोहीद खान, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जोहेब, सिमरनजीत सिंह आणि सगीर खान.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंह.
टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दोन्ही संघांचा हा टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिलावहिला सामना आहे.