बडी बडी बाते, गाजावाजा अन् काढल्या फक्त 9 धावा, कोण ‘तो’ जाणून घ्या…
आसिफ अली आता हळूहळू पाकिस्तान संघासाठी मोठी समस्या बनत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 40 T20I डावांमध्ये त्याने 136 च्या स्ट्राइक रेटने 476 धावा केल्या आहेत. या 40 डावांपैकी 23 डाव अशा होत्या.

नवी दिल्ली : मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात, मोठे मोठे दावेही केले जातात. पण, कामगिरी मात्र सुमार होते. असं म्हणतात की, ज्याला खरंच एखादं मोठं यश संपादन करायचं असतं तो आपलं काम निमुटपणे करतो. पण, पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेटरनं नुसता गाजावाजा केला, मोठं मोठे दावेही केले. प्रत्यक्षात मात्र त्यानं केलेली कामगिरी फारच सुमार ठरली असून तो आता सोशल मीडियावर (Social Media) टीकेचा धनी ठरला आहे. हा खेळाडू पाकिस्तानचा असून आसिफ अली (Asif Ali) असं त्याचं नाव आहे. त्यानं संपूर्ण आशिया चषकामध्ये फक्त 3 षटकार लगावले आहे. क्रिकेटची प्रॅक्टिस करताना त्यानं 100 ते 150 षटकार रोज मारण्याचा दावा केला होता. म्हणजे नुसता गाजावाजा झाला. पण, प्रत्यक्षात मात्र तसं काही झालं नाही.
फारच सुमार गोलंदाजी
आशिया चषकात पाकिस्तानच्या पराभवाचं कारण पाकिस्तान क्रिकेट संघाच्या गोलंदाजी हेच ठरलंय. गोलंदाजीतील सुमार काम हे यातून दिसून आलंय. त्यामुळे गोलंदाजीतील सुमार कामाची किंमत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला चुकवावी लागली. विशेष म्हणजे असिफ अली हा मीडियामध्ये चांगलाच गाजावाजा करत होता, मोठ-मोठे दावेही करत होता. प्रत्यक्षात मात्र काहीच झालं नाही. त्यानं केलेलं काम फारच सुमार होतं. पूर्ण चषकात असिफ अलीचीच कामगिरी खूप सुमार होती. त्यामुळे त्याचा संघालाही फटका बसला आणि शेवटी पराभव त्यांच्या पदरी पडला.
150 षटकांचा दावा केला
आसिफ अलीने आशिया कप 2022मध्ये 6 सामने खेळले आहे. यात 5 डावात त्याच्या बॅटमधून फक्त 41 धावा आल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 16 आणि सरासरी 8.20 होती. स्ट्राईक रेट 164 असला तरी बॅटने केवळ 2 चौकार आणि षटकार मारले की 3 धावा झाल्या. म्हणजेच 2022 च्या आशिया चषक स्पर्धेत आसिफ अलीकडून 50 धावाही झाल्या नाहीत.
23 डावात 9 पेक्षा कमी धावा
आसिफ अली आता हळूहळू पाकिस्तान संघासाठी मोठी समस्या बनत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 40 T20I डावांमध्ये त्याने 136 च्या स्ट्राइक रेटने 476 धावा केल्या आहेत. या 40 डावांपैकी 23 डाव अशा होत्या. यात आसिफ अलीच्या बॅटमधून 9 पेक्षा कमी धावा दिसल्या. म्हणजेच केवळ 17 डावांमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
हसरंगा 11 चेंडूत 4 वेळा बाद
आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात आसिफ अली खाते न उघडता बाद झाला . त्याला वानिंदू हसरंगाने बाद केले. T20I मध्ये आसिफ अलीने वानिंदू हसरंगासाठी 11 चेंडू खेळले आहेत. यावर तो 6 धावा करताना 4 वेळा बाद झाला आहे. आता जागतिक क्रिकेटमधील केवळ एका गोलंदाजाविरुद्ध 150 षटकारांचा सराव करणाऱ्या फलंदाजाची अवस्था झाली. यावरुन त्याच्या कामगिरीचा अंदाज बांधता येईल.
