AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Eng : स्टीव स्मिथ याचा झेल घेतल्यानंतरही नाबाद घोषित, पंच नितीन मेनन यांचा निर्णय पुन्हा चर्चेत

Ashes 2023, England vs Australia, 5th Test: ॲशेस सीरिजच्या पाचव्या कसोटीच्या पाचव्या दिवशी स्टीव्ह स्मिथला बेन स्टोक्सने झेल घेतला. पण एक चूक महागात पडली आणि नाबाद घोषित करण्यात आलं.

Aus vs Eng : स्टीव स्मिथ याचा झेल घेतल्यानंतरही नाबाद घोषित, पंच नितीन मेनन यांचा निर्णय पुन्हा चर्चेत
Aus vs Eng : बेन स्टोक्स याने स्टीव स्मिथ याचा झेल घेऊनही वाचला, नितीन मेनन याने असा घेतला निर्णय
| Updated on: Jul 31, 2023 | 10:43 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या निर्णायक असा पाचवा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी मालिका चौथ्या कसोटीतच वाचवली आहे. तर इंग्लंड पुढे कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून इंग्लंडचे खेळाडू खेळताना दिसत आहे. एकही संधी हातून सुटू नये यासाठी प्रयत्नशील आहे. पण बेन स्टोक्स हातून एक चूक घडली आणि स्टीव स्मिथ याला जीवदान मिळालं. खरं हा झेल बेन स्टोक्स याने घेतला होता पण सेलिब्रेशन करण्याच्या नादात हातून चेंडू सुटला, असंच सुरुवातीला वाटलं. त्यामुळे बाद की नाबाद असा प्रश्न उपस्थित झाला.

नेमकं काय घडलं तेव्हा…

मोइन अलीच्या गोलंदाजीवर स्टीव स्मिथने डिफेंस केला. पण चेंडू बॅट आणि पॅडला लागून लेग स्लिपला उभ्या असलेल्या बेन स्टोक्सच्या हाती गेला. त्याने एका हाताने झेल घेतला आणि सेलिब्रेशनच्या नादात हातून चेंडू सुटला. पंचांनी स्मिथला नाबाद घोषित केले. पंचांनी पॅडला बॉल लागल्याचं वाटलं असावं आणि त्यांनी नाबाद दिलं असावं असं कर्णधार बेन स्टोक्सला वाटलं. त्यामुळे त्याने डीआरएस घेतला.

डीआरएसचा निर्णय पंच नितीन मेनन यांच्याकडे गेला

डीआरएस घेतल्यानंतर रिप्ले पाहिला गेला. चेंडू स्मिथच्या बॅटला लागून स्टोक्सच्या हाती आल्याचं स्पष्ट झालं. पण थर्ड अंपायर नितीन मेनन यांनी बारकाईने हा झेल पाहिला. इंग्लंडच्या कर्णधाराने हा झेल घेतला होता. पण तो झेल पूर्ण केला नव्हता. कारण चेंडू हातात पकडल्यानंतर मोशनमध्ये खाली येताना पायाला हात लागला आणि चेंडू सुटला. पंचांनी झेल अपूर्ण मानून स्मिथला नाबाद घोषित केलं.

स्टीव स्मिथ याला नाबाद घोषित केल्यानंतर ओव्हलमधील प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर या झेल विरोधात रान पेटवलं गेलं. इतकंच काय तर हॅशटॅश नितीन मेनन करून ट्रोल करण्यात येत आहे. पण थर्ड अंपायर नितीन मेनन यांचा निर्णय योग्य होता. आयसीसीच्या नियमानुसार चेंडू पकल्यानंतर शरीराची पोजिशन पूर्ण होणं गरजेची आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.