AUS vs ENG Live Streaming : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना, पाचव्या विजयासाठी दोन्ही संघ सज्ज, कोण जिंकणार?
Australia vs England Womens World Cup 2025 Live Match Score : वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बुधवारी 22 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात अंजिक्य राहण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 2 संघच अजिंक्य आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा 1-1 सामना हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 9-9 पॉइंट्स आहेत. आता दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या सहाव्या सामन्यासाठी सज्ज आहेत. हे दोन्ही अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आणि एक संघ पाचवा विजय मिळवणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार एलिसा हीली हीला दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नाहीय. त्यामुळे एलिसाच्या अनुपस्थितीत ताहलिया मॅक्ग्रा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना बुधवारी 22 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
दोन्ही संघांची कामगिरी
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेत न्यूझीलंड, पाकिस्तान, टीम इंडिया आणि बांगलादेशला पराभूत केलं आहे. तर श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हा रद्द झालेला सामना ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेतील दुसरा सामना होता.
तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि श्रीलंका या 3 संघांना पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तर पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. तर इंग्लंडने 19 ऑक्टोबरला 4 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपला चौथा विजय मिळवला. त्यामुळे आता बुधवारी कोणता संघ पाचवा विजय मिळवतो आणि कुणाचा पराभव होतो? यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
