AUS vs IND 3rd Odi Toss : शुबमनविरोधात सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 बदल, कुणाला डच्चू?

Australia vs India 3rd ODI Toss and Playing 11 : भारतीय संघाने मालिका गमावल्यानतंर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. टीम मॅनेजमेंटने 2 बदल केले आहेत.

AUS vs IND 3rd Odi Toss : शुबमनविरोधात सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 बदल, कुणाला डच्चू?
Australia vs India 3rd Odi Toss and Playing 11
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 25, 2025 | 9:23 AM

टीम इंडियाचा वनडे कॅप्टन पहिल्याच मालिकेत दुर्देवी ठरला आहे. शुबमन गिल याच्याविरोधात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. उभयसंघातील अंतिम सामन्याचं आयोजन हे सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारताची एकदिवसीय सामन्यांत सलग टॉस गमावण्याची ही तब्बल 18वी वेळ ठरली आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. नॅथन एलिस याचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे झेव्हियर बार्टलेट याला बाहेर व्हावं लागलं आहे. तर भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. यातील 1 बदल हा नाईलाजाने करावा लागला आहे. टीम इंडियाचा युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे सामन्याला मुकावं लागलं आहे. नितीशला दुसऱ्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे नितीश तिसऱ्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. सध्या वैद्यकीय पथक नितीशवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. तसेच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा जोडीला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया लाज राखणार?

टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका गमावली आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे ही मालिका 3-0 ने जिंकण्याची संधी आहे. तर भारतासमोर ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप करण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत भारताला एकदाही वनडे सीरिजमध्ये क्लिन स्वीप करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे शुबमनसेना कांगारुंना रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

भारताला मोठा झटका


ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झँपा आणि जोश हेझलवुड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.