Aus vs Ind, 3rd Test | जिगरबाज जाडेजा, अंगठ्याला फ्रॅक्चर, तरीही इंजेक्शन घेऊन मैदानात उतरणार

रवींद्र जाडेला पहिल्या डावात फलंदाजी करताना अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.

Aus vs Ind, 3rd Test | जिगरबाज जाडेजा, अंगठ्याला फ्रॅक्चर, तरीही इंजेक्शन घेऊन मैदानात उतरणार
रवींद्र जाडेजा
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 11:21 AM

सिडनी : ऑस्ट्रलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) सिडनीत तिसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाच्या जिंकण्याच्या शक्यता जास्त आहे. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाची 289-5 अशी धावसंख्या आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 118 धावांची आवश्यकता आहे. हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन मैदानात कांगारुंच्या भेदक माऱ्याचा सामना करत आहेत. यानंतर भारताकडे खोलवर फलंदाज नाहीत. मात्र टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजीसाठी सज्ज आहे. जाडेजा दुखापतग्रस्त असूनही इंजेक्शन घेऊन खेळायला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (aus vs ind 3rd test all rounder jadeja will batting with injection in 2nd innings if team india needed)

जाडेजाला या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजावर स्कॅन करण्यात आला. या स्कॅन रिपोर्टमध्ये जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं. या दुखापतीमुळे जाडेजाला दुसऱ्या डावात गोलंदाजीही करता आली नव्हती.

जाडेजाने या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात कांगारुंच्या एकूण 4 फलंदाजांना बाद केलं. तसेच स्टीव्ह स्मिथला रॉकेट थ्रो करत रन आऊट केलं. तसेच बॅटिंगनेही तो कमाल करत होता. मात्र दुखापत झाल्याने त्याला 28 धावांवर मैदानाबाहेर जावे लागले.

जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या जागी संधी देण्यात आली. जाडेजाने या दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली. जाडेजाने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 57 धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 1 आणि 2 अशा एकूण 3 विकेट्स घेतल्या. तसेच दमदार फिल्डिंगही केली.

संबंधित बातम्या :

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : हनुमा विहारी-अश्विनचा संघर्ष जारी, विजयासाठी आणखी 118 धावांची गरज

(aus vs ind 3rd test all rounder jadeja will batting with injection in 2nd innings if team india needed)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.