AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind 4th Test | टीम इंडियाला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी गावसकरांचा गुरुमंत्र

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाला पाचव्या दिवशी विजयासाठी 324 धावांची आवश्यकता आहे.

Aus vs Ind 4th Test | टीम इंडियाला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी गावसकरांचा गुरुमंत्र
हिटमॅन रोहित शर्मा
| Updated on: Jan 18, 2021 | 4:25 PM
Share

ब्रिस्बेन : ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येत असलेला चौथा कसोटी सामना (Aus vs Ind 4th Test) रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने हे दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत बिनबाद 4 धावा केल्या. मात्र यानंतर पावसामुळे पुढे खेळ रद्द करावा लागला. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 324 धावांचे आव्हान असणार आहे. हा सामना फार निर्णायक स्थितीत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. जो सामना जिंकेल तो मालिकाही जिंकेल. दरम्यान लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला विजयी गुरुमंत्र दिला आहे. (aus vs ind 4th test little master sunil gavaskar get advice for team india to win brisbane test match)

गावसकर काय म्हणाले?

“रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे टीम इंडियाच्या महत्वाच्या फलंदाजांपैकी आहेत. या दोघांनी कोणत्याही दबावात खेळू नये. दोघांनी आपला नैसर्गिक पद्धतीने खेळावं. या दोघांनी आतापर्यंत जसे खेळले आहेत तसेच खेळावं. सोबतच शॉर्ट सेलेक्शन करताना जरा सावधानीने करावं”, असा सल्ला गावसकरांनी या दोन्ही फलंदाजांना दिला आहे.

कसोटी सामन्यात प्रत्येक दिवशी 90 ओव्हर्सचा खेळ होतो. टीम इंडियाला 300 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता आहे. “रोहित आणि पंत या दोघांनी हा विजयी आकड्याचे सत्रनिहाय विभागणी करुन त्या हिशोबाने खेळ करायला हवा. टीम इंडिया जर ठरवलेल्या योजनेनुसार खेळली तर या सामन्यात विजयी होऊ शकते”, असंही गावसकर म्हणाले.

मालिका बरोबरीत राहिल्यानंतरही ट्रॉफी आपल्यालाच

बॉर्डर गावसकर मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या चौथ्या सामन्याचा निकाल उद्या पाचव्या दिवशी लागणार आहे. हा सामना दोघांपैकी एक संघ जिंकेल किंवा अनिर्णित राहिल. ही मालिका बरोबरीत राहिल्यास ट्रॉफी कोणाला मिळणार, असा सवाल अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. साधारणपणे कसोटी मालिका बरोबरीत राहिल्यास ट्रॉफी दोन्ही संघांच्या कॅप्टन्ससोबत शेअर केली जाते. मात्र या बॉर्डर गावसकर मालिकेचे नियम जरा वेगळे आहेत.

मालिका बरोबरीत राहिल्यास ट्रॉफी कोणाला देण्यात यावी, यासाठी या मालिकेचे काही नियम आहेत. या नियमांनुसार जो संघ याआधी ही मालिका जिंकलेला असतो, त्या संघाला मालिका देण्यात येते, अशी तरतूद या नियमांमध्ये आहे. त्यामुळे हा चौथा सामन्याचा निर्णय नक्की काय लागतो, हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | नवखे खेळाडू कांगारुंवर भारी, शोएब अख्तरकडून टीम इंडियाच्या युवासेनेचं कौतुक

Aus vs Ind 4th Test | मोहम्मद सिराजची ‘फाईव्ह’ स्टार कामिगरी, मानाच्या पंगतीत स्थान

(aus vs ind 4th test little master sunil gavaskar get advice for team india to win brisbane test match)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.