AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS SF Toss : सेमी फायनलसाठी टीम इंडियात 3 बदल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध शफाली वर्माची एन्ट्री, आणखी कुणाला संधी?

India vs Australia 2nd Semi Final Toss and Playing 11 : टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात झटपट रोखण्याचं आव्हान आहे. भारताने या महत्त्वाच्या सामन्यासाठी 3 बदल केलेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली आहे.

IND vs AUS SF Toss : सेमी फायनलसाठी टीम इंडियात 3 बदल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध शफाली वर्माची एन्ट्री, आणखी कुणाला संधी?
AUS vs IND Womens Semi Final TossImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 30, 2025 | 4:37 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पुन्हा एकदा भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. ऑस्ट्रेलिया कॅप्टन एलिसा हिली हीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाला मोठा धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे.

दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी या आर या पार अशा सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताकडून 3 तर ऑस्ट्रेलियाकडून 1 बदल करण्यात आला आहे. फिनीशर ऋचा घोष आणि बॉलर क्रांती गौड या दोघींचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे उमा चेत्री आणि हर्लीन देओल या दोघींना बाहेर व्हावं लागलं आहे.

लेडी सेहवाग इज बॅक

तसेच टीम इंडियाची स्टार ओपनर प्रतिका रावल हीला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. प्रतिकाच्या जागी लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे. शफालीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शफालीला थेट उपांत्य फेरीत संधी मिळाल्याने तिच्यावर धावा करण्याचा दबाव असणार आहे. त्यामुळे शफालीसमोर आव्हानात्मक आणि निर्णायक सामन्यात मोठी खेळी करुन चमकण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाकडून 1 बदल, कुणाला संधी?

तर ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. जॉर्जिया वॉरहॅम हीच्या जागी सोफी मोलिनक्स हीला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया कांगारुंना रोखणार?

टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवायचं असेल तर ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतील एकमेव अजिंक्य टीम आहे. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भारतीय महिला संघाची प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, क्रांती गौड, ऋचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : फोबी लिचफील्ड, एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.