AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND Womens Semi Final WC Score and Updates : टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, जेमिमा रॉड्रिग्सची झुंजार खेळी

| Updated on: Oct 31, 2025 | 3:48 AM
Share

Australia vs India Semi Final, Womens World Cup 2025 Updates and Highlights In Marathi : ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया वूमन्स यांच्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चुरस होती. भारताने या सामन्यात 339 धावांचं आव्हान 9 बॉलआधी पूर्ण केलं आणि अंतिम सामन्यात धडक दिली.

AUS vs IND Womens Semi Final WC Score and Updates : टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, जेमिमा रॉड्रिग्सची झुंजार खेळी
AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score and UpdatesImage Credit source: PTI

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध यजमान टीम इंडिया आमनेसामने होते. उभयसंघातील या सामन्याचं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं. भारताने या सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने फोबी लिचफिल्ड हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 338 रन्स केल्या. त्यामुळे भारताला 339 धावांचं आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 48.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने यासह ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला आणि अंतिम फेरीत धडक दिली. भारताच्या या विजयात जेमिमा रॉड्रिग्स आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी प्रमुख भूमिका बजावली. जेमिमाने नाबाद 127 रन्स केल्या.  तर हरमनप्रीतने 89 रन्स केल्या. आता अंतिम फेरीत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 30 Oct 2025 10:43 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, कांगारुंंना 5 विकेटने नमवलं

    टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. भारताने फक्त 5 विकेट गमवून हे लक्ष्य गाठलं. जेमिमा रॉड्रिग्सने शतकी खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने 134 चेंडूत नाबाद 127 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 89 धावा केल्या. या दोघांची भागीदारी विजयासाठी महत्त्वाची ठरली. भारताचा अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला होईल. दरम्यान, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही.

  • 30 Oct 2025 10:40 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : 12 चेंडूत 8 धावांची गरज, कोण मारणार बाजी?

    टीम इंडियाला 12 चेंडूत 8 धावांची गरज आहे. भारताकडे अजूनही 5 विकेट आहेत. तसेच जेमिमा रॉड्रिग्स मैदानात शतकी खेळीसह तग धरून आहे

  • 30 Oct 2025 10:35 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडियाला पाचवा धक्का, रिचा घोष बाद

    टीम इंडियाला रिचा घोषच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. 16 चेंडूत 26 धावा करून बाद झाली आहे. टीम इंडियाला 18 चेंडूत 23 धावांची गरज आहे.

  • 30 Oct 2025 10:27 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडिया 300 पार, विजयासाठी 36 धावांची गरज

    टीम इंडियाने 300 पार मजल मारली आहे. ऋचा घोष हीने मोठा फटका मारत भारताला 303 धावांपर्यंत पोहचवलं.  त्यामुळे आता टीम इंडियाला 32 बॉलमध्ये आणखी 36 रन्सची गरज आहे. जेमीमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष ही जोडी खेळत आहे.

  • 30 Oct 2025 10:14 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : जेमीमा रॉड्रिग्सचं झुंजार शतक, भारताला विजयासाठी आणखी 70 धावांची गरज

    टीम इंडियाची अनुभवी फलंदाज जेमीमा रॉड्रिग्स हीने झुंजार शतक झळकावलं आहे. जेमीमाचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरं शतक ठरलं आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी आणखी 70 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 339 रन्सचं टार्गेट दिलं आहे.

  • 30 Oct 2025 10:10 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : भारताला चौथा झटका, दीप्ती शर्मा रन आऊट, सामना रंगतदार स्थितीत

    भारताने सामन्यात निर्णायक क्षणी गरज नसताना चौथी विकेट गमावली आहे. जेमिमाह रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या दोघींमध्ये 1 धावेसाठी ही विकेट गमवावी लागली. दीप्ती शर्मा स्ट्राईक एंडवर ही चोरटी धाव घेताना रन आऊट झाली. दीप्ती 24 धावा केल्या.

  • 30 Oct 2025 10:01 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : भारताच्या 250 धावा पूर्ण, जेमिमाह शतकाच्या दिशेने

    भारताने 338 रन्सचा पाठलाग करताना 39.1 ओव्हरमध्ये 250 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे भारताला आता 65 बॉलमध्ये आणखी 88 रन्सची गरज आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा या दोघी खेळत आहेत.

  • 30 Oct 2025 09:51 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : भारताची सेट जोडी ऑस्ट्रेलियाने अखेर फोडली, कॅप्टन हरमनप्रीत कौर आऊट

    ऑस्ट्रेलियाला अखेर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर सेट जोडी फोडणयात यश आलं आहे. ऑस्ट्रलेलियाने कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला आऊट केलं आहे. अनाबेल सदरलँड हीने हरमनप्रीतला एश्ले गार्डनरच्या हाती हरमनप्रीतला कॅच आऊट केलं. हरमनने 88 बॉलमध्ये 89 रन्स केल्या.

  • 30 Oct 2025 09:33 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडियाचं द्विशतक पूर्ण, जेमिमा रॉड्रिग्स-हरमनप्रीत जोडी मैदानात

    टीम इंडिया वुमन्सने 339 धावांचा पाठलाग करताना 200 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतासाठी आता मैदानात कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमीमा रॉड्रिग्स ही सेट जोडी खेळत आहे. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे भारताने याच जोडीने भारताला विजयी करावं, अशी इच्छा भारतीय चाहत्यांची आहे.

  • 30 Oct 2025 09:15 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी

    कर्णधार हरमनप्रीत कौरने 65 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यात तिने 6 चौकार मारले आहेत. तर जेमिमासोबत 100 धावांची भागीदारी केली आहे. अजूनही भारताला विजयासाठी 160 धावांची गरज आहे.

  • 30 Oct 2025 09:06 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांच्यात 100 धावांची भागीदारी

    जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांच्यात 100 धावांची भागीदारी झाली आहे. जेमिमा नाबाद 66 आणि हरमनप्रीत नाबा 46 धावांवर खेळत आहे. भारताच्या 2 बाद 163 धावा झाल्या आहेत.

  • 30 Oct 2025 08:42 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : जेमिमा रॉड्रिग्सची अर्धशतकी खेळी

    जेमिमा रॉड्रिग्सकडे 57 चेंडूत 8 चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं आहे. जेमिमा आणि कौरची जोडी जमली असून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या जोडीने आणखी तग धरला तर भारताच्या विजयाच्या आशा वाढतील.

  • 30 Oct 2025 08:30 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : भारताच्या 18 षटकात 2 गडी बाद 100 धावा

    भारताने 18 व्या षटकात दोन गडी गमवून 100 धावांचा पल्ला गाठला आहे. जेमिमा रॉड्रिग्स नाबाद 42 आणि हरमनप्रीत कौर नाबाद 17 धावांवर खेळत आहे. अजूनही विजयासाठी 235 धावांची गरज आहे.

  • 30 Oct 2025 08:11 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची अपेक्षा

    ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना भारताच्या दोन विकेट झटपट गेल्या. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. या जोडीवर भारताच्या विजयाची आशा असणार आहे.

  • 30 Oct 2025 08:00 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : स्मृती मंधाना 24 धावा करून बाद

    टीम इंडियाला 338 धावांचा पाठलाग करताना दुसरा धक्का बसला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना 24 धावा करून बाद झाली आहे. त्यामुळे टीम इंडियावरील दबाव वाढला आहे.

  • 30 Oct 2025 07:23 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : भारताला पहिला झटका, शफाली वर्मा आऊट

    ऑस्ट्रेलियाने भारताला 13 धावांवर पहिला झटका दिला आहे. शफाली वर्मा 10 धावा करुन एलबीडब्ल्यू आऊट झाली आहे. किम गार्थने शफालीला आऊट केलं आणि भारताला पहिला धक्का दिला.

  • 30 Oct 2025 07:20 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, शफाली-स्मृती सलामी जोडी मैदानात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 339 रन्सचं टार्गेट दिलं आहे. भारताने पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 8 धावा केल्या आहेत.

  • 30 Oct 2025 06:51 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलियाला 338 रन्सवर ऑलआऊट, टीम इंडियाचं जोरदार कमबॅक

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरआधी ऑलआऊट केलं आहे. मात्र टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला मोठी धावासंख्या उभारण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. भारताने ऑस्ट्रेलियाचं 49.5 ओव्हरमध्ये 338 रन्सवर ऑलआऊट केलंय. ऑस्ट्रेलियासाठी फोबी लिचफिल्ड हीने सर्वाधिक 119 रन्स केल्या. तर एलिसा पेरी आणि एश्ले गार्डनर या दोघींनी अर्धशतक झळकावलं. भारतासाठी श्री चरणी आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

  • 30 Oct 2025 06:15 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : जेमिमाह रॉड्रिग्सचा कडक थ्रो, ताहिला मॅग्राथ रन आऊट, ऑस्ट्रेलियाला सहावा झटका

    जेमिमाह रॉड्रिग्स हीने अचूक थ्रो करत ताहिला मॅग्राथ हीला विकेटकीपर ऋचा घोष हीच्या मदतीने रन आऊट केलं आहे. यासह भारताने ऑस्ट्रेलियाला सहावा झटका दिला आहे. ताहिलाने 7 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 30 Oct 2025 06:03 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : एलिसा पेरी आऊट, ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका, टीम इंडियाचं कमबॅक

    राधा यादव हीने सेट एलिसा पेरी हीला क्लिन बोल़्ड केलंय. यासह भारताने यासह ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. एलिसा पेरी हीने 88 बॉलमध्ये 77 रन्स केल्या.

  • 30 Oct 2025 05:55 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : श्री चरणीचा डबल धमाका, ऑस्ट्रेलियाला चौथा झटका

    श्री चरणीने ऑस्ट्रेलियाला चौथा झटका देत वैयक्तिक दुसरी विकेट मिळवली आहे. श्री चरणीने अनाबेल सदरलँडला 3 रन्सवर आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. श्रीने त्याआधी बेथ मुनीला आऊट करत ऑस्ट्रेलियाला एकूण तिसरा झटका दिला होता.

  • 30 Oct 2025 05:46 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका, बेथ मुनी आऊट

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. श्री चरणी हीने बेथ मुनीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. चरणीने मुनीला जेमीमाह रॉड्रिग्सच्या हाती कॅच आऊट केलं. मुनीने  22 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

  • 30 Oct 2025 05:13 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : फोबी लिचफिल्ड क्लिन बोल्ड, अमनजोत कौरला मोठं यश, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

    अमनजोत कौर हीने टीम इंडियाच्या दुसऱ्या विकेटची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. अमनजोत कौर हीने सेट फोबी लिचफिल्ड हीला क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रन्स केल्या.

  • 30 Oct 2025 05:09 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : फोबीची लिचफिल्डचा दांडपट्टा सुरु, टीम इंडियाची धुलाई

    फोबी लिचफिल्ड हीने शतकानंतर गिअर बदलला आहे. फोबीने शतकानंतर मोठे फटके मारत टीम इंडियाला आणखी बॅकफुटवर ढकललं आहे. तसेच एलिसा पेी आणि फोबी लिचफिल्ड या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारीही केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला दुसरी विकेट कोण आणि कधी मिळवून देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 30 Oct 2025 04:59 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : फोबी लिचफिल्डचं खणखणीत शतक, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

    ऑस्ट्रेलियाची ओपनर फोबी लिचफ्लड हीने खणखणीत शतक पूर्ण केलं आहे. फोबीने 24 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर फोर ठोकून शतक पूर्ण केलं. फोबीचं हे भारतातील दुसरं एकदिवसीय शतक ठरलं. फोबीने शतकासाठी 77 चेंडूचा सामना केला.

  • 30 Oct 2025 04:55 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण, फोबी लिचफिल्ड शतकातच्या उंबरठ्यावर

    ऑस्ट्रेलियाने 22.2 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 50 धावा 44 चेंडू, त्यानंतर पुढील 50 धावा या 48 चेंडूत पूर्ण केल्या. तर कांगारुंनी 101 ते 150 धावा या 42 चेंडूत पूर्ण केल्या.

  • 30 Oct 2025 04:33 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात

    ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरी आणि फोबी लिचफिल्ड या जोडीने घट्ट पाय रोवले आहेत. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 77 बॉलमध्ये 90 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. ऑस्ट्रेलियाने 18 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 115 रन्स केल्या आहेत. तर टीम इंडियाला या सामन्यात कायम रहायचं असेल तर लवकरात लवकर ही जोडी फोडावी लागणार आहे.

  • 30 Oct 2025 04:16 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : फोबी लिचफ्लडचं अर्धशतक, ऑस्ट्रेलिया शतकाच्या दिशेने

    ऑस्ट्रेलियाची ओपनर फोबी लिचफ्लड हीने अर्धशतक झळकावलं आहे. फोबीचं एकदिवसीय कारकीर्दीतील नववं अर्धशतक ठरलं आहे. फोबीने 45 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाने 14 ओव्हरमध्ये 89 धावा केल्या आहेत.

  • 30 Oct 2025 03:57 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात

    ऑस्ट्रेलियाने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 9 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 60 धावा केल्या आहेत. फोबी लिचफिल्ड 39 आणि एलीसा पेरी 6 रन्सवर खेळत आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.

  • 30 Oct 2025 03:44 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : पावसाच्या विघ्नानंतर खेळ सुरु, ऑस्ट्रेलियाच्या 6 ओव्हरनंतर 34 रन्स

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सेमी फायनलला पावसानंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 34 रन्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड आणि एलिसा पेरी ही जोडी मैदानात खेळत आहे.

  • 30 Oct 2025 03:35 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : सामन्यात पावसाचं विघ्न, खेळ थांबवला

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स उपांत्य फेरीतील सामन्यात पावसाने विघ्न घातलं आहे. पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने खेळ थांबवला तोवर 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 25 रन्स केल्या होत्या. फोबी लिचफिल्ड 17 रन्सवर नॉट आऊट आहे. तर एलीसा हीली 5 रन्सवर आऊट झाली. भारतासाठी क्रांती गौड हीने पहिली विकेट घेतली.

  • 30 Oct 2025 03:27 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, कॅप्टन एलिसा हीली क्लिन बोल्ड

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. क्रांती गौड हीने ऑस्ट्रेलिया कॅप्टन एलिसा हीली हीला क्लिन बोल्ड केलं आहे.  एलिसा हीलीने 15 बॉलमध्ये 5 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 30 Oct 2025 03:24 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : हरमनप्रीतकडून मोठी चूक,एलिसा हीलीचा कॅच ड्रॉप

    टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने मोठी संधी गमावली आहे. रेणुका सिंह हीने टाकलेल्या सामन्यातील तिसर्‍या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीली हीचा कॅच सोडला. हरमनप्रीतने एलिसाचा 1 धावेवर कॅच सोडला. आता भारताला ही चूक महागात पडणार की नाही? हे थोड्याच वेळाच स्पष्ट होईल.

  • 30 Oct 2025 03:04 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Score : सामन्याला सुरुवात, ऑस्ट्रेलियाची बॅटिंग, एलीसा-लिचफिल्ड मैदानात

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील उपांत्य सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून एलीसा हीली आणि फोबी लिचफिल्ड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाचा ही सलामी जोडी झटपट फोडण्याचा प्रयत्न असणार आहे.

  • 30 Oct 2025 02:39 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन

    फोबी लिचफील्ड, ॲलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.

  • 30 Oct 2025 02:39 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.

  • 30 Oct 2025 02:35 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : उपांत्य फेरीत भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल, ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

    उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन ताहिला मॅग्राथ हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

  • 30 Oct 2025 02:15 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीतील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

  • 30 Oct 2025 02:14 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक

    उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात बुधवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली. दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आता अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यापैकी कोण खेळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

  • 30 Oct 2025 02:10 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वूमन्स ऑस्ट्रेलिया टीम

    ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिसा पेरी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, अ‍ॅलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, हीदर ग्राहम, डार्सी ब्राउन, अ‍ॅलिसा हीली आणि सोफी मोलिनेक्स.

  • 30 Oct 2025 02:08 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया

    हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार) उमा चेत्री (विकेटकीपर),शफाली वर्मा, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष आणि क्रांती गौड.

  • 30 Oct 2025 02:04 PM (IST)

    AUSW vs INDW 2nd Semi Final Live Updates : ऑस्ट्रेलिया-इंडिया आमनेसामने, कोण पोहचणार फायनलमध्ये?

    आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्याचं आयोजन हे आज 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात दोन्ही संघात जोरदार रस्सीखेच असणार आहे.

Published On - Oct 30,2025 2:03 PM

Follow us
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.