IND vs SA : टीम इंडियाकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 वर्षांपूर्वीचा हिशोब करण्याची संधी, धर्मशालेतील आकडेवारी कशी?
Team India Record At Dharamshala : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा धर्मशालेतील दुसरा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या मैदानातील आपल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत केलं होतं.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरु आहे. ही मालिका 2 सामन्यांनंतर बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा रविवारी 14 डिसेंबरला खेळवण्यात आला आहे. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाचा दावा मजबूत करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने मालिकेत विजयी सुरुवात केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात गुडघे टेकले. दुसऱ्या सामन्यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यामुळे भारताला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियासमोर पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची धर्मशालेतील कामगिरी कशी राहिली आहे? हे आकडेवारीतून जाणून घेऊयात.
टीम इंडियाची धर्मशालेतील कामगिरी
टीम इंडियाने आतापर्यंत धर्मशालेतील या स्टेडियममध्ये एकूण 3 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर भारताला एका टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने किती सामने खेळलेत?
तसेच दक्षिण आफ्रिकेला या मैदानात विजयी मिळवण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेने या मैदानात 2015 साली टीम इंडिया विरुद्ध एकमेव सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकने भारताला तेव्हा पराभूत केलं होतं. अशात आता दक्षिण आफ्रिका या मैदानात 10 वर्षांनी पुन्हा विजयी होणार की टीम इंडिया या पराभवाची परतफेड करणार? यासाठी सामन्याच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
वरुण चक्रवर्ती याच्याकडे अर्शदीपला पछाडण्याची संधी
दरम्यान तिसर्या सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याच्याकडे अर्शदीप सिंग याला पछाडण्याची संधी आहे. वरुणला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 50 विकेट्स घेण्याबाबत अर्शदीपला मागे टाकण्याची संधी आहे. वरुणने आतापर्यंत 31 सामन्यांमध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे वरुणला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सच्या अर्धशतकासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये वेगवान 50 विकेट्स घेण्याचा विक्रम हा कुलदीप यादव याच्या नावावर आहे. कुलदीपने 30 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर अर्शदीप आणि रवी बिश्नोई हे दोघे संयुक्तरित्या (33 सामने) दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे वरुण 1 विकेट घेताच या यादीत थेट दुसऱ्या स्थानी पोहचेल.
