AUS vs PAK Test : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला दिली मजबूत लढत, तिसऱ्या दिवशी कळणार निकाल काय तो

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामन्यांचा दुसरा दिवस पार पडला. पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसली. मात्र दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने तोडीस तोड उत्तर दिलं आहे.

AUS vs PAK Test : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला दिली मजबूत लढत, तिसऱ्या दिवशी कळणार निकाल काय तो
AUS vs PAK Test : ऑस्ट्रेलियाला पाकिस्ताननं दिलं तोडीस तोड उत्तर, सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसावर ठरणार
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 4:21 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीकोनातून प्रत्येक कसोटी सामन्याला महत्त्व आलं आहे. प्रत्येक सामन्यात जय पराजय आणि ड्रॉ बरंच काही घडामोडी घडवून जाते. विजयी टक्केवारीवर गुणतालिकेत टॉपला असलेले दोन संघ अंतिम फेरीत खेळतात. सध्या पाकिस्तान संघ टॉपला असून पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 487 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला पहिल्या डावात बॅकफूटला ढकलता येईल. पण पाकिस्ताननेही तोडीस तोड उत्तर दिलं आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर दोन गडी गमवून 100 हून अधिक धावा करणं कठीण आहे. ते पण दिवसाच्या शेवटच्या सत्रात.. दुसऱ्या दिवसअखेर दोन गडी गमवून 132 धावा केल्या. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी सामना विजयाच्या दिशेने की ड्रॉच्या दिशेने कूच करतो हे कळणार आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी जबरदस्त खेळी केली. डेविड वॉर्नरने 211 चेंडूंचा सामना करत 164 धावा केल्या. यात 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तर मिचेल मार्शचं शतक अवघ्या 10 धावांनी हुकलं. त्याने 107 चेंडूत 90 धावा केल्या. यात 15 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. पाकिस्तानकडून आमेर जमाल याने सर्वाधिक 6 गडी बाद केले. त्यानंतर खुर्रम शहजादने 2, शाहीन आफ्रिदीने 1 आणि फहीम अश्रफने 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावांचं आव्हान ठेवल्याने पाकिस्तान गोत्यात येईल असं वाटलं होतं. पण दुसऱ्या दिवशी तुल्यबळ लढत दिली. अब्दुल्ला शफीकने 42, शान मसूद 30 धावा करून बाद झाले. तर इमाम उल हक नाबाद 38 आणि खुर्रम शहजाद नाबाद 7 धावांवर खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी ही जोडी टिकली तर ऑस्ट्रेलियाचा विजय कठीण होईल. पण तिसऱ्या धडाधड विकेट्स पडल्या मात्र कठीण आहे. इतकंच काय तर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं पहिलं स्थान गमवावं लागेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.