टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार फॉर्मात, बीबीएलमध्ये ठोकलं वादळी शतक

Big Bash League: बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स आमनेसामने आलेत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने झंझावाती शतक ठोकलं. या शतकासह त्याने नववर्षाची सुरुवात केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार फॉर्मात, बीबीएलमध्ये ठोकलं वादळी शतक
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात, बीबीएलमध्ये ठोकलं वादळी शतक
Image Credit source: Steve Bell/Getty Images
| Updated on: Jan 01, 2026 | 5:47 PM

Mitchell Marsh Hundred In Big Bash League: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध क्रिकेट संघांना लागले आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या 20 संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने या वर्षीची सुरुवात धमाकेदार केली आहे. मिचेल मार्श पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळत आहेत.स्पर्धेतील 19वा सामना होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात झाला. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 229 धावा केल्या. या सामन्यात मिचेल मार्शने शतक ठोकलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली. मिचेल मार्शने सामन्यात ओपनिंग करताना शतकी खेळी केली. मार्शने 58 चेंडूत 102 धावांची खेळी केली. त्याने 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. या डावात त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 175.86चा होता.

होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मिचेल मार्शने त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्सने 3 गडी गमवून 229 धावा केल्या. तसेच विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना हॉबर्ट हरिकेन्सला 9 गडी गमवून 20 षटकात 189 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना पर्थ स्कॉर्चर्सने 40 धावांनी जिंकला. मिचेल मार्शने बीबीएलमधील दुसरं शतक ठोकलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेची धुरा मिचेल मार्शच्या खांद्यावर असल्याने त्याचं हे शतक खास आहे. मिचेल मार्शने या शतकासह कर्णधारपदाखाली कोणताही दबाव नसल्याचं दाखवून दिलं आहे. त्याची या खेळीने ऑस्ट्रेलियन संघालाही बळ मिळालं आहे.

मिचेल मार्शला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यावेळी त्याने सांगितलं की, ‘हे मैदान जिंकण्यासाठी खूप कठीण बनले आहे. त्यामुळे आमच्यासाठी खरोखरच महत्त्वाचा विजय आहे.आमचा संघ चांगला आहे. आमच्या अधिक अननुभवी गोलंदाजांनी या पहिल्या काही आठवड्यात काही खरी वाढ दाखवली आहे. तर, ते आमच्यासाठी अद्भुत आहे. आशा आहे की आम्ही जिंकत राहू शकू. मला वाटत नाही की आम्हाला ऑफ-सीझन मिळेल, नाही का? मी म्हणेन, मला वाटते की आरोन हार्डी थोडा कडक होता. त्याने 40 चेंडूत 90 धावा केल्या आणि 1 विकेट घेतला. स्कॉर्चर्स जिंकत राहतील अशी आशा करूया.’