टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, नाव कमावलेल्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे आता संघाची घोषणा करण्याची लगबग सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे. संघ घोषित करणारा चौथा संघ ठरला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत, इंग्लंडने आपले संघ जाहीर केले आहेत. आता ऑस्ट्रेलियानेही या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. कर्णधारपदाची धुरा मिचेल मार्शच्या खांद्यावर असून 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया निवड समितीने सर्वांना धक्का असा एक निर्णय घेतला आहे. संघात पॅट कमिन्स, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड या सारखे अनुभवी खेळाडू आहेत. तर फिरकीची जबाबदारी एडम झम्पाकडे असणार आहे. संघ निवडीत ऑस्ट्रेलियाने फिरकीला महत्त्व दिलं आहे. पण निवडकर्त्यांनी 2025 वर्ष गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डावललं आहे. इतकंच मागच्या 12 टी20 आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर असलेल्या खेळाडूला संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना निवडकर्त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडला आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघातून मिशेल ओवेनला वगळलं आहे. तर कूपर कॉनोलीचा संघात समावेश केला आहे. मिचेल ओवेनने बीबीएलमध्ये सिडनी थंडरविरुद्ध होबार्ड हरिकेन्सकडून खेळताना वादळी शतक झळकावलं होतं. तेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने 42 चेंडूत 11 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या होत्या. मिशेल ओवेनला पीएसएलमधून आयपीएल खेळण्याची थेट ऑफर मिळाली होती. त्याने पीएसएल सोडलं आणि थेट प्रीति झिंटाच्या पंजाब किंग्स संघात 3 कोटींसह रुजू झाला. पण ऑस्ट्रेलिया संघात निवड न होण्याचं काही कारणं आहेत.
View this post on Instagram
मिशेच ओवेन तसा चर्चेत होता. पण त्याची आकडेवारी काही समाधानकारक नव्हती. त्याने 50 टी20 सामन्यात 981 धावा केल्या आहेत. यात 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात फक्त 163 धावा केल्या. भारतात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारतात खेळलेल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने फक्त 14 धावा केल्या होता. दुसरीकडे, गेल्या 12 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर असलेल्या कूपर कोनोलीला संघात स्थान मिळालं आहे. इतकंच काय तर मॅथ्यू शॉर्ट, मॅट कुन्हेमन आणि झेव्हियर बार्टलेटला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे.
टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅविस हेड, पॅट कमिंस, मार्कस स्टोइनिस, जॉश हेजलवुड, नाथन एलिस, जेवियर बार्टलेट, मैथ्यू वेड, कूपर कोनोली, एडम झम्पा, मॅट कुन्हेमन, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, जॉश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल.
