IND vs AUS : इथेही पराभवाने सुरुवात, भारताचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Australia vs India Women 1st Odi Match Result : टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडमधील खेळाडूंनी अपवाद वगळता निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारताला पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं.

IND vs AUS : इथेही पराभवाने सुरुवात, भारताचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
Smriti Mandhana Indian Women Crikcet Team
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2026 | 5:33 PM

टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. मात्र सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया सुपर 8 मध्ये विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने रविवारी 22 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतावर 76 धावांनी मात करत सलग पाचवा विजय मिळवला. टीम इंडियाची या पराभवामुळे सेमी फायनचं समीकरण बिघडलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मेन्सप्रमाणे वूमन्स टीमलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर काही दिवसांपूर्वी तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात मात केली. टीम इंडियाने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. महिला ब्रिगेडची ऑस्ट्रेलियात कोणतीही मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे चाहत्यांसह खेळाडूंमध्ये उत्साह होता. मात्र वूमन टीम इंडिया एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली.

टीम इंडियाची हारकीरी

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी 24 फेब्रुवारीला टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बॉलिंग आणि बॅटिंगने अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 9 बॉलआधी ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाने महिला ब्रिगेडला 48.3 ओव्हरमध्ये 214 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर कांगारुंनी 70 बॉलआधी 6 विकेट्स राखून विजयी आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 38.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 217 धावा केल्या.

सामन्यात काय झालं?

भारताने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना, काश्वी गौतम आणि ऋचा घौष या चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही हरमनप्रीत आणि स्मृती या दोघींनी अर्धशतक झळकावलं. मात्र हरमनप्रीत आणि स्मृती या दोघींनाही अर्धशतकी खेळीला मोठ्या आकड्यात बदला आलं नाही.

स्मृतीने सर्वाधिक 58 धावा केल्या. हरमनप्रीतने 53 धावांची खेळी केली. काश्वी गौतम हीने 43 धावांचं योगदान दिलं. तर ऋचा घोष हीने 43 धावा केल्या. प्रतिका रावल अली तशीच झिरोवर आऊट होऊन गेली. शफाली वर्मा 4, जेमीमाह रॉड्रिग्स 8 आणि दीप्ती शर्मा हीने 2 धावांचं योगदान दिलं. तर लोअर ऑर्डरमधील फलंदाजांना धावा जोडता आल्या नाहीत. त्यामुळे भारताचा डाव 214 धावांवर आटोपला.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

कॅप्टन एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. भारताने 55 धावांवर ही जोडी फोडली. विकेटकीपर ऋचा घोष हीने श्री चरणीच्या बॉलिंगवर फोबीला स्टपिंग केलं. फोबीने 32 धावा केल्या. चरणीने त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर जॉर्जिया वॉल हीला झिरोवर आऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 55-0 वरुन 55-2 असा झाला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन विजय निश्चित केला. कॅप्टन हीलीने 50 धावा केल्या. बेथ मुनी हीने सर्वाधिक 76 रन्स केल्या. तर अनाबेल सदरलँड आणि एश्लेघ गार्डनर या दोघींनी ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. अन्नाबेल हीने नाबाद 48 धावा केल्या. तर गार्डनर 5 रन्सवर नॉट आऊट राहिली.