AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUSW vs INDW, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. आता या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

AUSW vs INDW, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 10:06 PM
Share

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले गेले. ज्यामध्ये भारतीय महिलांनी मालिका 2-1 च्या फरकाने गमावली. आता या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्याला गुरुवारपासून (30 सप्टेंबर)  सुरुवात होणार आहे. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान हा सामना पार पडणार आहे.

भारतासाठी ही एक ऐतिहासिक टेस्ट मॅच असेल. कारण भारतीय महिला प्रथमच डे-नाइट टेस्ट मॅच खेळणार असून ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तब्बल 15 वर्षानंतर कसोची सामना खेळणार आहेत. याआधी दोन्ही संघानी 2006 मध्ये एडिलेड येथे टेस्ट मॅच खेळली होती. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता. याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी जूनमध्ये  इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यावेळी सात वर्षानंतर भारतीय महिला कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना गुरुवारी, 30 सप्टेंबर कॅरारा ओव्हल या क्वीन्सलँड येथीली मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरु होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SonyLiv वर असेल.

अशी होती एकदिवसीय सामन्यांची मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली खरी पण सर्वच भारतीय महिलांनी उत्तम खेळीचे दर्शन यावेळी घडवलें. पहिला सामना 9 विकेट्सने गमावल्यावर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांना 5 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. पण अखेरच्या सामन्यात 2 विकेट्सने भारताने विजय मिळवला. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन संघाचा सलग 26 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विजयी रथही भारताने थांबवला.

हे ही वाचा

ICC Women ODI Rankings: मिताली राजची रँकिंग घसरली, गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र मोठा फायदा

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

(AUSW vs INDW, 1st Test live Streaming When And Where To watch online to free in marathi)

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.