शाकिब अल हसनकडून ऑल टाईम वनडे 11 जाहीर, भारताचे तीन फलंदाज; पण…
शाकिब अल हसन हे बांग्लादेश क्रिकेटमधील मोठं नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आहे. सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फलंदाज म्हणून ख्याती आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 706 विकेट घेत त्याने विक्रम रचला आहे. आता त्याने आपली ऑल टाईम वनडे इलेव्हन जाहीर केली आहे.

बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या शाकिब अल हसनने ऑल टाईम वनडे इलेव्हनची निवड केली आहे. त्याने जगभरातील दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने स्वत:ला ठेवलं आहे. तर भारताच्या तीन फलंदाजांना स्थान दिलं असून एका दिग्गज खेळाडूचं नाव मात्र विसरला आहे. शाकिब अल हसनने आपल्या संघात सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि सईद अन्वर यांची निवड केली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल असेल. रनमशिन्स विराट कोहलीची निवड चौथ्या स्थानासाठी केली आहे. तर दक्षिण अफ्रिकेच्या जॅक कॅलिसला पाचव्या क्रमांकावर स्थान दिलं आहे. भारताचा यशस्वी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी सहाव्या स्थानावर येईल. विशेष म्हणजे या संघाचं कर्णधारपद त्याने महेंद्रसिंह धोनीकडे दिलं आहे. दिनेश कार्तिकने मागे संघ जाहीर केला होता. तेव्हा त्याने या संघात धोनीला स्थान दिलं नव्हतं. त्यानंतर त्याने चुकीबाबत जाहीर माफी मागितली होती. तर सातव्या धोनीला स्थान देत कर्णधारपद सोपवलं होतं.
शाकिब अल हसनने सातव्या क्रमांकावर स्वत:ला स्थान दिलं आहे. बांगलादेशचा तो एकमेव खेळाडू या संघात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न या संघात आठव्या स्थानावर असेल. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन नवव्या स्थानी असेल. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानच्या वसीम अक्रम आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्रा यांची निवड केली आहे. पण या संघात रोहित शर्माला स्थान मिळालेलं नाही. रोहित शर्माचा वनडेतील रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. तीन द्विशतकं ठोकत त्याने एक वेगळाच विक्रम रचला आहे. असं असताना त्याचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शकिब अल हसनची ऑल टाईम वनडे इलेव्हन : सचिन तेंडुलकर (भारत), सईद अन्वर (पाकिस्तान), ख्रिस गेल (वेस्ट इंडिज), विराट कोहली (भारत), जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रिका), महेंद्रसिंह धोनी (भारत), शाकिब अल हसन (बांगलादेश), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), वसीम अक्रम (पाकिस्तान) आणि ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया).
