IND vs SL: विराटच्या फॅन्ससमोर BCCI झुकलं, कोहलीच्या 100 व्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी

रतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांच्या दबावापुढे अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नमते घ्यावे लागले आहे. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे.

IND vs SL: विराटच्या फॅन्ससमोर BCCI झुकलं, कोहलीच्या 100 व्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी
Virat KohliImage Credit source: File/AFP
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:55 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांच्या दबावापुढे अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नमते घ्यावे लागले आहे. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे, जो भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test Match) देखील आहे. तत्पूर्वी, बोर्डाने या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नव्हती, ज्यासाठी कोरोना संसर्ग आणि पंजाब निवडणुकीची मतमोजणी ही कारणं सांगण्यात आली होती. मात्र याआधी धर्मशाला येथे खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यावेळी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.

वृत्तसंस्था एएनआयने बोर्डाचे सचिव जय शाह यांच्या हवाल्याने सांगितले की, पंजाब क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. शाह म्हणाले, “मोहाली येथील पंजाब क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी रिकाम्या स्टेडियममध्ये होणार नाही. मी पीसीए अधिकार्‍यांशी बोललो आहे आणि त्यांनी पुष्टी केली आहे की, चाहते विराट कोहलीच्या 100 व्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होऊ शकतील.

बीसीसीआयच्या निर्णयावरुन गदारोळ

यापूर्वी रविवारी 27 फेब्रुवारी रोजी पंजाब क्रिकेट असोसिएशनने मोहाली कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पीसीएने सांगितले होते की, कोरोनाचा धोका लक्षात घेता भारतीय बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र, बंगळुरूमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन बोर्डाच्या निर्णयावर कडाडून टीका केली आणि बोर्डाला हा निर्णय बदलण्याचे आवाहन केले. आता बोर्डानेही दबावाखाली येऊन निर्णय मागे घेतला आहे.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.