AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : बीसीसीआयने परत फसवलं? उन्मुक्त चंदसारखा ‘हा’ हुकमी खेळाडूही देश सोडण्याच्या वाटेवर?

Cricket : उन्मुक्त चंद याला तर भारताचा दुसरा विराट कोहली बोललं जात होतं मात्र संधी न दिल्याने त्याने वेगळ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आणखी एक खेळाडू असाच काहीसा निर्णय घेण्यााच्या मार्गावर आहे.

Team India : बीसीसीआयने परत फसवलं? उन्मुक्त चंदसारखा 'हा' हुकमी खेळाडूही देश सोडण्याच्या वाटेवर?
| Updated on: Jun 04, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते. कित्येक वर्षांची मेहनत आणि त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं यानंतर टीम इंडियाचं दारं खुली होतात. मात्र काही मोजक्याच खेळाडूंचं हे स्वप्न पूर्ण होतं. काही खेळाडू त्या गुणवकत्तेचे असूनही फक्त आणि फक्त संधी अभावी ते मागे राहून जातात.

इतक्या वर्षांची मेहनत तर अशीच सोडून देऊ शकत नाही. त्यानंतर काही खेळाडू मनावर दगड ठेवून मोठा निर्णय घेतात. उन्मुक्त चंद याला तर भारताचा दुसरा विराट कोहली बोललं जात होतं मात्र संधी न दिल्याने त्याने वेगळ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आणखी एक खेळाडू असाच काहीसा निर्णय घेण्यााच्या मार्गावर आहे.

उन्मुक्त चंद याने भारत सोडून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 28 व्या वर्षी, उन्मुक्त चंदने दुसऱ्या देशात आपले भविष्य घडवण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता असाच गुणवंत खेळाडू  आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कायम आपल्या धाकड खेळींमुळे चर्चेत राहणार  सरफराज खान आहे.

सरफराज 2013 पासून भारतातील डोमेस्टिक सर्किटमध्ये आहे. तो वर्षानुवर्षे आपल्या कामगिरीत सुधारणा करत आहे. रणजी ट्रॉफीच्या 3 हंगामात सरफराज खानची सरासरी 100 च्या वर आहे. पण तरीही भारतीय संघात त्याची जागा बनवली जात नाहीये. सतत कामगिरी करूनही दुर्लक्ष केल्यास सरफराज खानही उन्मुक्त चंदचा मार्ग अवलंबू शकतो.

दरम्यान, सर डॉन ब्रॅडमन यांचाही विक्रम सरफराज खान मोडीत काढत धावांचा रतीब लावला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सरफराजला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतलं होतं मात्र त्याला अपेक्षित अशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र बीसीसीआय एक तरी संधी या खेळाडूला देतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.