AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता स्पर्धेचं स्वरूप असं काही असेल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. दिग्गज खेळाडू देखील स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता स्पर्धेचं स्वरूप असं काही असेल
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता सामन्यांचं स्वरूप असं काही असेलImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 23, 2025 | 3:42 PM
Share

बीसीसीआयने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट रुपडं पालटलं आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा वैभव प्राप्त झालं आहे. दिग्गज खेळाडू देखील स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा बदल बीसीसीआयने केला आहे. हा निर्णय देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धांसाठी असणार आहे. बीसीसीआय वनडे क्रिकेटचा फॉर्मेट बदलणार आहे. आता देशांतर्गत वनडे स्पर्धेत तु्म्हाला प्लेट ग्रुप सिस्टम पाहायला मिळेल. या नव्या पर्वापासून हा बदल लागू होणार आहे. या नियमाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार ठआहे. पहिला सामना नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन, दुसरा सामना सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनमध्ये होईल.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफी असो की वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धा, अंडर 23 पुरुष राज्य ए ट्रॉफी वनडे स्पर्धा असो.. या स्पर्धेतील सर्व चार संघ चार एलिट आणि एक प्लेट गटात विभागले जातील. तळातील सहा संघ प्लेट गटात असतील. यापूर्वी प्रत्येक पर्वात प्लेट गटातील दोन संघ वर जायचे. तर दोन संघ खाली यायचे. त्यानंतर एक संघाला वर किंवा खाली जायचा. या बदलाच्या माध्यमातून देशांतर्गत क्रिकेट आणखी भक्कम करण्याचा हेतू बीसीसीआयचा आहे. यामुळे प्रत्येक संघाची पारख होईल. तसेच चांगल्या खेळाडूंची निवड करणं सोपं होईल.

टीम इंडिया 2026 या वर्षात काही महत्त्वाचे वनडे सामने खेळणार आहे. या निर्णयामुळे काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते.या आधी बीसीसीआयने रणजी स्पर्धेत एलीट आणि प्लेट ग्रुप फॉर्मेटमध्ये सामने खेळवण्याचा निर्णय घेतला होता. रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धा याच फॉर्मेटमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेची सुरुवात ऑक्टोबरपासून होणार आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी20 स्पर्धेतही बीसीसीआयने बदल केला आहे. येथे बाद फेरीऐवजी सुपर लीग स्टेज आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.