IND vs ENG: ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रुममधील ही दृश्य पाहिलीत का?, आनंदाच्या वातावरणात खेळाडूंच्या प्रतिक्रिया, पाहा VIDEO

ओव्हलच्या मैदानात तब्बल 50 वर्षांनी विजयी पताका फडकावल्यानंतर भारतीय संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळची ड्रेसिंग रुममधील काही दृश्य BCCI ने ट्विट केली आहेत.

IND vs ENG: ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रुममधील ही दृश्य पाहिलीत का?, आनंदाच्या वातावरणात खेळाडूंच्या प्रतिक्रिया, पाहा VIDEO
विराट कोहली आणि मोहम्मद शमी (सौजन्य-BCCI)
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:48 PM

लंडन : भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) ओव्हल टेस्टमध्ये (Oval Test) इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी दारुण पराभव केला. हा विजय अनेक प्रकारे भारतासाठी महत्त्वाचा होता. इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडला पराभूत करण प्रत्येक संघासाठी मोठी गोष्ट असते. त्यात चौथी कसोटी ही एक प्रकारे निर्णयाक होती. यातील विजयामुळे भारत मालिका पराभूत होणं आता अशक्य झालं आहे. 4पैकी 2 सामने भारत तर 1 इंग्लंडने जिंकला आहे. त्यामुळे पाचवा सामना अनिर्णीत ठरला किंवा भारताने जिंकला तरी  मालिका भारताच्या नावावर होईल. तर इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल. तसंच ओव्हलच्या मैदानावर भारताने 1971 नंतर पहिल्यांदाच विजय मिळवल्याने हा विजय अनेक बाजूंनी भारतासाठी महत्त्वाचा होता.

तर या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे मैदानात जल्लोष करुन ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. ड्रेसिंग रुममध्येही खेळाडू एका वेगळ्याच उत्साहात दिसत होते. रोहित शर्मा, उमेश यादव आणि शार्दूल यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी दिली.

रोहित म्हणतो शार्दूल विजयाचा खरा शिल्पकार

सामनावीर मिळाल्यानंतर रोहित शर्माने पुरस्कार तर स्वीकारला पण एक महत्त्वाची गोष्ट म्हटला. त्याने सर्वांसमोर ‘खरा सामनावीर आणि भारताच्या विजयाचा हिरो’ म्हणून शार्दुल ठाकुरचं नाव घेतलं. तो म्हणाला, “मला वाटतं या सन्मानाचा खरा हकदार मी नाही शार्दूल ठाकूर आहे. माझ्या मते हा पुरस्कार त्याला मिळायला हवा होता.” रोहितच्या या वक्तव्यामुळे शार्दूलचा आत्मविश्वास तर वाढला असेलच पण यातून रोहितची खेळाडू वृत्तीही पाहायला मिळाली.

मी खास कामगिरीसाठीच मैदानात उतरलो होतो – शार्दूल

सामन्यानंतर बोलताना शार्दूल ठाकूरने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, ”ज्या दिवशी मला कळालं मी सामन्यात खेळत आहे. तेव्हाच मी ठरवलं मला खास कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान द्यायचं होतं. प्रशिक्षकांच्या शिकवणीमुळेच मी गोलंदाजीसह फलंदाजीतही खास कामगिरी करु शकलो.”

सर्व संघाचा विजय – उमेश यादव

बऱ्याच काळानंतर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले्या उमेश यादवने सामन्यात काही महत्त्वाटे बळी घेतले. भारताच्या या विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या यादवने सामन्यानंतर बोलाताना सांगितले, ”हा विजय सर्व संघाने मिळून मिळवला आहे. माझीच नाही सर्वांचीच कामगिरी भारी झाली. रोहित राहुलच्या उत्तम सुरुवातीनंतर ज्याप्रमाणे दोन्ही डावात शार्दूलने फलंदाजी केली. त्यामुळे सामन्यातील तणाव दूर झाला.”

इतर बातम्या

चौथ्या कसोटीत विजयानंतरही विराट आणि शास्त्रींवर BCCI नाराज, नेमकं प्रकरण काय?

IND vs ENG: बुमराहला अप्रतिम कामगिरीचं फळ, ICC च्या खास पुरस्कारासाठी नामांकित

IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी, भारताची इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत आघाडी

(BCCI Posted Indias Dressing room scenes After historic win at oval test against england)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.