ICC U-19 World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीमचा अहमदाबादमध्ये होणार सन्मान, BCCI ची घोषणा

पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद (ICC Under 19 World Cup 2022) पटकावणाऱ्या भारताच्या युवा संघावर सध्या बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे.

ICC U-19 World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीमचा अहमदाबादमध्ये होणार सन्मान, BCCI ची घोषणा
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 6:58 PM

अहमदाबाद: पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद (ICC Under 19 World Cup 2022) पटकावणाऱ्या भारताच्या युवा संघावर सध्या बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. रविवारी बीसीसीआयने (BCCI) वर्ल्डकप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाखाचे तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपये इनाम म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या यश धुलच्या संघाचा अहमदाबादमध्ये सन्मान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भारताच्या युवा संघाने शनिवारी फायनलमध्ये (India U19 vs England U19) इंग्लंडला नमवलं. गयानामधील भारताच्या उच्चायुक्तांनी युवा विजेत्या संघाची भेट घेतली. विजयानंतर अंडर 19 टीमने मैदानावर जल्लोष केला. पण आता रविवारी संध्याकाळी यश धुलचा संघ मायदेशी निघण्यासाठी परतीचा प्रवास सुरु करणार आहे. एम्सटर्डम आणि बेंगळुरुमार्गे टीम अहमदाबादमध्ये पोहोचणार आहे.

भारताचा सीनियर संघ सध्या अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिका खेळतोय. अंडर 19 च्या टीमला वरिष्ठ खेळाडूंसोबत संवाद साधायला मिळणार की, नाही हे अजून स्पष्ट नाहीय. “मुलांचं वेळापत्रक खूप व्यस्त होतं. त्यांना आराम करण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला नाही” असं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं.

फायनल जिंकल्यानंतर भारताची अंडर 19 टीम अँटिंग्वावरुन गयानाला रवाना झाली आहे. तिथे भारताचे उच्चायुक्त केजे श्रीनिवासन यांनी टीमला सन्मानित केलं. थकलेले असतानाही भारताच्या युवा खेळाडूंनी कार्यक्रमात उपस्थित असलेले वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्यासोबत फोटो काढले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.