AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणार

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआय एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी बीसीसीआयपुढे आपलं म्हणणं मांडलं होतं. आता कुठे त्यांचं म्हणणं ऐकण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. लवकरच त्यावर मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणार
आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणारImage Credit source: PTI
| Updated on: May 03, 2026 | 5:16 PM
Share

BCCI on Impact Player Rule: आयपीएल 2026 स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू झाल्यापासून संघांची रणनिती बदलली. इम्पॅक्ट प्लेयर नियम 2023 पासून लागू झाला होता. या नियमासह आयपीएल स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी हा नियम लागू केला होता. मात्र या नियमामुळे क्रिकेटची खरी मजा निघून जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कारण सामना एखाद्याचा पारड्यात झुकला असताना इम्पॅक्ट प्लेयरमुळे सामन्याचं चित्रच बदलून जातं. सामन्याच्या परिस्थितीनुसार संघ आपली फलंदाजी किंवा गोलंदाजी खेळाडूत बदल करत आहेत. त्यामुळे योग्य रणनिती आखणं कठीण जात आहे. इतकंच काय तर अष्टपैलू खेळाडूचं महत्त्वही कमी झाला आहे. असं असताना बीसीसीआयने आता या नियमावर एक निवेदन जारी केलं आहे. आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा आढावा घेण्यासाठी योजना आखत आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की, हा नियम गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. सध्या त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. हा नियम लागू झाल्यापासून आयपीएल स्पर्धेत धावांचा वर्षावर होता आहे. आता 250 पेक्षा जास्त धावा करणं सामान्य बाब झाली आहे. सपाट खेळपट्ट्यांवर हा नियम फलंदाजांच्या फायद्याचा आहे. इतकंच काय गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जात आहे. 2024 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या नियमाविरुद्ध आवाज उठवला होता. रोहित शर्माने थेट मत मांडत हा नियम आवडत नसल्याचं सांगितलं. इतकंच काय तर विराट कोहलीनेही रोहित शर्माचं म्हणणं योग्य असल्याचं सांगितलं होतं.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, “काही सामने कमी धावसंख्येचे होत आहेत. सर्व चाहते सामन्यांचा आनंद घेत आहेत. गोलंदाजांनाही चांगल्या विकेट्स मिळत आहेत. तुम्ही धावफलक पाहिल्यास, काही संघ खूप कमी धावा करत आहेत आणि काही संघ तर 260 धावांचा पाठलागही करत आहेत. हे सर्व घडत आहे; हे एकाच पॅकेजमध्ये संपूर्ण चित्र आहे.”

देवजित सैकिया पुढे म्हणाले, “हा नियम गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही त्याचा आढावा घेऊ आणि स्पर्धेच्या मध्यभागी आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मी अधूनमधून माध्यमांमध्ये याबद्दल वाचले आहे. पण जर संघांकडून अशी विनंती आली, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पण अद्याप अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही.”

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!