IND vs AUS : Axar Patel मुळे टीम इंडियातील एका युवा प्लेयरच करिअर संपल्यात जमा

IND vs AUS 3rd Test : अक्षर चांगली कामगिरी करतोय, ही टीमसाठी चांगली बाब आहे. पण त्यामुळे एका युवा प्लेयरच्या करिअरला धोका निर्माण झाला आहे. अक्षरच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्या खेळाडूच टीम इंडियात पुनरागमन कठीण बनलय.

IND vs AUS : Axar Patel मुळे टीम इंडियातील एका युवा प्लेयरच करिअर संपल्यात जमा
Axar patel Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 10:36 AM

IND vs AUS 3rd Test : टीम इंडियातील लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अक्षर चांगली कामगिरी करतोय, ही टीमसाठी चांगली बाब आहे. पण त्यामुळे एका युवा प्लेयरच्या करिअरला धोका निर्माण झाला आहे. अक्षरच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्या खेळाडूच टीम इंडियात पुनरागमन कठीण बनलय. टीम इंडियासाठी या खेळाडूने शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. म्हत्त्वाच म्हणजे याच इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये अक्षर पटेलने डेब्यु केला होता. अक्षर पटेलची टीम इंडियात एंट्री होताच, एका खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झालेत. मागच्या 2 वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी या खेळाडूचा संघर्ष सुरु आहे.

त्या खेळाडूच नाव काय?

अक्षर पटेलमुळे भारतीय टीममधून जागा गमावलेल्या खेळाडूच नाव शाहबाज नदीम आहे. तो अक्षर सारखाच लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज आहे. 33 वर्षाच शाहबाज नदीम टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना 5 ते 9 फेब्रुवारी 2021 दरम्यान खेळला होता. चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध शाहबाज शेवटची टेस्ट मॅच खेळला. त्यानंतर बाहेर गेलाय तो अजून टीम इंडियात पुनरागमन करु शकलेला नाही. शाहबाज नदीम भारतासाठी दोन कसोटी सामने खेळलाय. यात त्याने 8 विकेट काढलेत.

नाईलाजाने घ्यावा लागेल सन्यास

अक्षर पटेलच्या टीम इंडियातील एंट्री नंतर शाहबाज नदीमच टेस्ट करिअर जवळपास संपल्यात जमा आहे. अक्षर पटेल 13-17 फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नईमध्ये टेस्ट डेब्यु केला होता. त्यानंतर तो टीम इंडियाचा महत्त्वाच सदस्य बनला. अक्षर पटेलने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यात 48 विकेट घेतलेत. शाहबाज नदीमचा फर्स्ट क्लासमधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. शाहबाज नदीमने 126 सामन्यात 28.71 च्या सरासरीने 489 विकेट घेतलेत. IPL करिअरही धोक्यात

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची टेस्टमध्ये शाहबाज नदीमने 19 ऑक्टोबर 2019 मध्ये डेब्यु केला. शाहबाज नदीने डेब्यु टेस्ट मॅचमध्ये 4 विकेट घेतले. शाहबाज नदीमने 72 आयपीएल मॅचेसमध्ये 48 विकेट घेतल्यात. शाहबाज नदीम आपला अखेरचा आयपीएल सामना 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळला होता. शाहबाज नदीम मागच्यावर्षी आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.