IPL 2022 Mark Wood Ruled Out: होळीच्या दिवशी लखनौ सुपर जायंट्स संघाला बसला मोठा झटका

Mark Wood Ruled Out: IPL 2022 इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL) सुरु व्हायला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरलेला असताना लखनौ सुपरजायंट्स संघाला (lucknow super giants) मोठा झटका बसला आहे.

IPL 2022 Mark Wood Ruled Out: होळीच्या दिवशी लखनौ सुपर जायंट्स संघाला बसला मोठा झटका
IPL 2022 सुरु होण्याआधी लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मार्क वुड बाहेर Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:19 PM

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL) सुरु व्हायला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरलेला असताना लखनौ सुपरजायंट्स संघाला (lucknow super giants) मोठा झटका बसला आहे. लखनौ आयपीएलमधला नवीन संघ आहे. वेगवान गोलंदाज आणि मॅच विनर मार्क वुड (Mark Wood) यंदाच्या सीजनमध्ये लखनौ संघाकडून खेळू शकणार नाहीय. दुखापतीमुळे मार्क वुडने आयपीएलमधून माघार घेतली आहे. मागच्या काही दिवसांपासून मार्क वुड आयपीएलमधून माघार घेऊ शकतो, अशी चर्चा होती. अखेर ती खरी ठरली आहे. सध्या इंग्लंडची वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेदरम्यानच मार्क वुडला कोपराची दुखापत झाली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला झालेल्या दुखापतीसारखीच ही दुखापत आहे. तेव्हापासूनच मार्क वुड आयपीएलमध्ये खेळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. ती अखेर खरी ठरली आहे. मार्क वुडने आयपीएलमधून माघार घेणं, हा लखनौ संघासाठी मोठा झटका आहे. कारण तो लखनौच्या गोलंदाजी युनिटच आयपीएलमध्ये नेतृत्व करणार होता.

प्रतितास 145 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता

मार्क वुड लखनौ सुपर जायंट्सने आखलेल्या रणनितीचा एक मुख्य भाग आहे. प्रतितास 145 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची वुडकडे क्षमता आहे. तो सतत एकाच स्पीडमध्ये गोलंदाजी करु शकतो, ती त्याची खासियत आहे. त्यामुळे लखनौ संघाने या गोलंदाजाला 7.5 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. पण आता वुड खेळत नसल्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघासाठी तो एक झटका आहे.

आगमी T 20 वर्ल्ड कपलाही मुकणार?

मार्क वुडला झालेली दुखापत जोफ्रा आर्चरच्या दुखापती सारखीच आहे. जोफ्रा आर्चर मागच्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याचा कोपरा सूजला होता. मार्क वुडची दुखापतही अशीच आहे. फक्त आयपीएलच नाही, तर वुड आगामी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेलाही मुकू शकतो.

माघार घेणारा तिसरा इंग्लिश क्रिकेटपटू

आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मार्क वुडच्या आधी जेसन रॉयने बायो बबलचे कारण देऊन माघार घेतली. त्याला गुजरात टायटन्सने विकत घेतलं होतं. त्याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर एलेक्स हेल्सने सुद्धा याच कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.

नेमका झटका का मोठा आहे, ते समजून घ्या

मार्क वुडची माघार लखनौ सुपर जायंट्ससाठी झटका यासाठी आहे कारण परदेशी गोलंदाजांचे त्यांच्याकडे मर्यादीत पर्याय उपलब्ध आहेत. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर जेसन होल्डर, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनीस आणि श्रीलंकेचा दुशमंथा चामीरा हे त्यांच्याकडे परदेशी वेगवान गोलंदाज आहेत. होल्डर आणइि स्टॉयनिस सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. कारण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या अनुक्रमे इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध मालिका सुरु आहेत. वेस्ट इंडिजची इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका 28 मार्चला संपणार आहे. त्याचदिवशी सुपर जायंट्सचा पहिला सामना आहे. ऑस्ट्रेलियाची पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिका एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.