IPL मध्ये होणार मोठे फेरबदल, मुकेश अंबानी यांना गौतम अदानी देणार टक्कर
आयपीएलमध्ये दरवर्षी मोठे बदल होत आहेत. या लीगमध्ये जगभरातील अनेक खेळाडू खेळतात. य़ा लीगमध्ये हजारो कोटींची उलाढाल होते. अनेक मोठ्या उद्योगपतींनी आयपीएल संघावर पैसे लावले आहेत. आता अंबानी यांच्या नंतर अदानी यांची देखील आयपीएलमध्ये एन्ट्री होणार असल्याचं कळतं आहे.

: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये अनेक देशाचे खेळाडू सहभागी होत असतात. आयपीएलमध्ये सध्या १० संघ खेळत असून सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांचं मोठं मनोरंजन होत आहे. त्यातच आता पण पुढचा आयपीएल सीजन आणखी रंजक होणार असल्याचं कळत आहे. कारण आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच देशातील दोन बड्या उद्योगपतींमध्येही टक्कर पाहायला मिळणार आहे.
गौतम अदानी यांची आयपीएलमध्ये एन्ट्री
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीत अंबानी या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालक आहेत. मुंबई इंडियन्सने यपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यातच आता गौतम अदानी देखील आयपीएलमध्ये प्रवेश करू शकतात अशी बातमी समोर येत आहे. आयपीएलमधील संघ गुजरात टायटन्सचे मालकी हक्क लवकरच अदानीच्या हातात जाऊ शकतात अशी चर्चा आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) लॉग-इन कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार आहे. गुजरात टायटन्सचे बहुतेक समभाग खाजगी इक्विटी फर्म CVC कडे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, CVC आता आपले शेअर्स विकण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अदानी समूहाचे मालक गौतम अदानी गुजरात टायटन्सचे मालकी हक्क विकत घेऊ शकतात अशी चर्चा आहे.
गुजरात टायटन्स कोणाला मिळणार?
तीन वर्षांपूर्वी गुजरातचा संघ आयपीएलमध्ये दाखल झाला होता. गुजरात टायटन्सचे मूल्य $1 अब्ज इतके आहे. CVC ने 2021 मध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायझी 5,625 कोटी रुपयांना खरेदी केली होती. अदानी समूहाला ही आयपीएल फ्रँचायझी खरेदी करता आली नव्हती. पण आता अदानी समूह आणि टोरंटो यांच्यात सर्वाधिक भागभांडवल खरेदीसाठी शर्यत सुरू आहे. CVC साठी शेअर्स विकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. CVC चे मुख्यालय लक्झेंबर्ग येथे आहे, तर अदानी आणि टोरंटो ग्रुपचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सचे मालकी हक्क कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. CVC, अदानी ग्रुप आणि टोरंटो यांनी या प्रकरणी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
