AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी या टीमने केलं क्वॉलिफाय,अशी मारली बाजी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 13 संघ निश्चित झाले आहेत. तर 7 संघ पात्रता फेरीतून निश्चित होतील. अमेरिकेत पार पडलेल्या पात्रता फेरीतून 13 वा संघ ठरला आहे.

भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी या टीमने केलं क्वॉलिफाय,अशी मारली बाजी
भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठीसाठी या टीमने केलं क्वॉलिफाय,अशी मारली बाजीImage Credit source: TV9 Network
Updated on: Jun 22, 2025 | 4:08 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंका या देशांकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी आता 12 संघ आधीच निश्चित झाले होते. त्यात आता पात्रता फेरीतून एका संघाची निवड झाली आहे. कॅनडाने अमेरिकन क्वॉलिफायर स्पर्धेत बहामासला सात विकेट पराभवाची धूळ चारली आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एन्ट्री मारली आहे. विशेष म्हणजे कॅनडा संघाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतही भाग घेतला होता. कॅनडा संघ पात्र ठरल्याने आता एकूण पात्र होणाऱ्या संघांची संख्या 13 झाली आहे. यात भारत आणि श्रीलंका यजमान असल्याने थेट एन्ट्री मिळाली आहे. तर आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानला आयसीसी क्रमवारीच्या माध्यमातून एन्ट्री मिळाली आहे. तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज हे या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

पात्रता फेरीत कॅनडा आणि बहामास हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा बहामास संघ 57 धावांवर आटोपला. बहामासकडून फक्त दोनच खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला. जोनाथन बॅरीने 10 आणि जावेल गॅलिमोर याने 14 धावा केल्या. तर दोन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. युजिन डफ आणि फेस्टस बेन हे शून्यावर बाद झाले. तर फिरकीपटू कलीम सना आणि शिवम शर्माने प्रत्येकी 3 विकेट घेतले. तर अंश पटेलने 2 आणि साद बिन जफरने एक विकेट घेतली. इतकं छोटं टार्गेट कॅनडाने 5.3 षटकात पूर्ण केलं. यात दिलप्रीत बाजवाने नाबाद 36 धावांची खेळी केली आणि विजय मिळवून दिला. तर युवराज सामरा 5, निकोलस किर्टन 2 आणि हर्ष ठाकर 14 धावांवर बाद झाले.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही सात संघ निश्चित होणार आहे. यात दोन संघ युरोपियन क्वॉलिफायरमधून येणार आहेत. ही पात्रता फेरी 5 ते 11 जुलैदरम्यान होणार आहे. दोन संघ अफ्रिकन क्वॉलिफायरमधून निश्चित होतील. ही पात्रता फेरी 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होईल. तर आशिया ईएपी पात्रता फेरीतून तीन संघ निश्चित होतील. 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान ही पात्रता फेरी पार पडेल.

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या
मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या.
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला.
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर.
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...