AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : …फरक नाय पडत, सलग 2 पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरची अजब प्रतिक्रिया

Harmanpreet Kaur Post Match Presentataion : ऑस्ट्रेलिया विरुद्ध 330 धावा केल्यानंतर टीम इंडिया जिंकले असं वाटत होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने आपण गतविजेते का आहोत हे दाखवून दिलं आणि भारताला पराभूत केलं. या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने अजब प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs AUS : ...फरक नाय पडत, सलग 2 पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरची अजब प्रतिक्रिया
Harmanpreet Kaur Post Match PresentataionImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2025 | 12:44 AM
Share

हरमप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया रविवारी 12 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि सलग तिसरा विजय मिळवला. कॅप्टन एलिसा हीली हीने ऑस्ट्रेलिया विजयात प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावांची खेळी केली. भारताला अशाप्रकारे 330 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतरही कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

टीम इंडिया मायदेशात होत असलेल्या या वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह खेळत आहे. त्यामुळे भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवतेय. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात ही उणीव प्रकर्षणाने जाणवली. यावर आम्ही याबाबत विचार करु. मात्र 2 पराभवांच्या आधारावर कोणता निर्णय व्हायला नको असं हरमनप्रीतने म्हटलं.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

“आम्ही बसू आणि यावर विचार करु. या कॉम्बिनेशनने आम्हाला विजयी केलं आहे. 2 खराब सामन्यांमुळे फरक पडणार नाही. आम्हाला पुढे अनेक मुद्द्यांवर काम करायचं आहे. आम्ही सर्वच सकारात्मक दृष्टीकोनातून खेळू”, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीतने सामन्यानंतर दिली.

टीम इंडियाची पुन्हा घसरगुंडी

दरम्यान टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने भारतासाठी दीडशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर टीम इंडियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 294 रन्स केल्या. त्यामुळे भारताला 360-370 धावा करण्याची नामी संधी होती. मात्र इथेच गेम झाला.

ऑस्ट्रेलियाने भारताच्या उर्वरित 6 विकेट्स या 36 धावांच्या मोबदल्यात मिळवल्या. त्यामुळे टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला 48.5 ओव्हरमध्ये 330 रन्सवर ऑलआऊट केलं.

हरमनप्रीतने काय म्हटलं?

“ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्यानुसार 30-40 धावा करण्याची गरज होती. मात्र शेवटच्या 6 ओव्हरमध्ये धावा झाल्या नाहीत. त्याचाच फटका बसला. ही खेळपट्टी बॅटिंगसाठी फायदेशीर होती. मात्र शेवटच्या 6 ओव्हरमध्ये फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली”, असंही हरमनप्रीतने सामन्यानंतर बोलताना नमूद केलं.

जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम.