AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy : आम्ही काय फक्त मॅक्सवेलविरुद्ध खेळायला आलो आहोत का? अफगाणिस्तानच्या कर्णधाराने सुनावलं

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्तानने पुन्हा एकदा उलटफेर केला आहे. बलाढ्य अशा अफगाणिस्तान संघाचा 8 गडी राखून पराभव केला. तसेच उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. पण ऑस्ट्रेलियाचं खडतर आव्हान पार पाडावं लागणार आहे. असं असताना अफगाणिस्तानच्या कर्णधाराने आपला हेतू स्पष्ट केला आहे.

Champions Trophy : आम्ही काय फक्त मॅक्सवेलविरुद्ध खेळायला आलो आहोत का? अफगाणिस्तानच्या कर्णधाराने सुनावलं
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2025 | 6:49 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत अफगाणिस्तानने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. लिंबूटिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या संघाने बलाढ्य इंग्लंडला स्पर्धेच्या बाहेर फेकून दिलं आहे. इंग्लंडला अफगाणिस्तानचं आव्हान सोपं वाटत होतं. पण अफगाणिस्तानने इंग्लंडला तारे दाखवले. ब गटातून इंग्लंडचा संघ आऊट झाला असून उपांत्य फेरीच्या शर्यतील ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. अफगाणिस्तानसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून अफगाणिस्तानला जिंकणं भाग आहे. पण अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्वंद्व विसरून कसं चालेल. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मॅक्सवेलने एक हाती सामना जिंकून दिला होता. तर टी20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची वाट रोखली होती. त्यामुळे हे द्वंद्व आता सोपं राहिलं नाही. या सामन्याचं महत्त्व ओळखून पत्रकारांना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी प्रश्न विचारला. अष्टपैलू मॅक्सवेल विरोधात काही प्लान वगैरे आखला की नाही? त्यावर त्याने सडेतोड उत्तर दिलं.

‘तुम्हाला काय वाटतं, आम्ही इथे फक्त मॅक्सवेल विरोधात खेळायला आलो आहोत का? तुम्हाला असंच वाटतं का? आम्ही संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध योजना आखली आहे. मला माहिती आहे की मॅक्सवेलने 2023 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी केली होती. पण तो आता भुतकाळ झाला आहे.’, असं उत्तर शाहिदीने दिलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे 7 विकेट 100 च्या आत पडले होते. पण मॅक्सवेलच्या नाबाद 201 खेळीने 292 धावा गाठणं सोपं झालं. तसेच ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला.

‘वनडे वर्ल्डकपनंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हरवलं आहे. आम्ही विरोधी संघाबाबत असाच विचार करतो. आम्ही येथे एखाद्या खेळाडूविरोधात खेळण्यासाठी आलो नाहीत. आम्ही आमच्या योग्य रितीने वापरून प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याचा मानस ठेवतो. त्यामुळे आम्ही काय मॅक्सवेल विरोधात खेळण्यासाठी आलो नाहीत. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहोत.’, असंही शाहिदी याने सांगितलं. ‘

टमला वाटते की हा क्रिकेटसाठी एक चांगला सामना असेल आणि आमचे लक्ष गोष्टी सोप्या ठेवण्यावर असेल आणि उपांत्य फेरी खेळण्याबद्दल जास्त काळजी करू नये. आम्ही आमचे मूलभूत काम चांगले करण्याचा प्रयत्न करू.’, असंही शाहिदी पुढे म्हणाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.