बिझनेसमॅन Ms Dhoni ची नवी खेळी, ड्रोन बनवणाऱ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन M.S.Dhoni क्रिकेटच नाही, त्याच्या पुढचाही विचार करतो. भारताचा कॅप्टन कुल हळूहळू बिजनेसच्या पीचवर आपली पकड मजबूत करत आहे.

बिझनेसमॅन Ms Dhoni ची नवी खेळी, ड्रोन बनवणाऱ्या कंपनीत  इन्व्हेस्टमेंट
MS dhoni Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:17 AM

मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन M.S.Dhoni क्रिकेटच नाही, त्याच्या पुढचाही विचार करतो. भारताचा कॅप्टन कुल हळूहळू बिजनेसच्या पीचवर आपली पकड मजबूत करत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी सेंद्रीय शेतीमध्ये (Business) रमला. त्याच्या फार्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. या सर्व भाज्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. धोनी क्रिकेट बरोबरच बिझनेसमध्येही तितकाच इंटरेस्ट घेतो. धोनीने आता ड्रोन्स बनवणाऱ्या एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. चेन्नईस्थित गरूड एयरोस्पेस (Garuda Aerospace) या कंपनीत धोनीने गुंतवणूक केली आहे. धोनीने नेमकी किती रक्कम गुंतवलीय ते स्पष्ट नाहीय. गरूड एयरोस्पेस ही भारतातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे. धोनी या कंपनीत इन्वेस्टर तर आहेच, पण त्याच बरोबर तो चेहरा सुद्धा असणार आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड एंबेस्डर असणार आहे.

धोनी कशी गुंतवणूक करणार?

गरूड एयरोस्पेसचें संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले की, “एमएस धोनीने इन्वेस्टर आणि ब्रँड एंबेस्डर म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे” “आम्हाला जे मिळवायचे आहे, धोनीचा विचारही तसाच आहे. त्याचा आमच्यावर विश्वास आहे. यापेक्षा आम्हाला चांगला भागीदार आणि एंबेस्डर नसता मिळाला. धोनी कंपनीत टप्याटप्याने गुंतवणूक करणार आहे” असं अग्निश्वर जयप्रकाश यांनी सांगितलं.

धोनी सोबत अन्यही गुंतवणूकदार

“धोनीसोबत आणखी काही गुंतवणूकदारही कंपनीत इन्वेस्ट करणार आहेत. आम्ही जुलैच्या अखेरपर्यंत 30 मिलियन डॉलर सीरीज ए राउंड बंद करतोय. पंतप्रधानांनी ड्रोन महोत्सव आयोजित केलाय. त्यानंतर लोकांचा ड्रोनमध्ये रुची वाढलीय” असं अग्निश्वर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कधी सुरु झाली गरूड एयरोस्पेस कंपनी?

चेन्नई स्थित गरूड एयरोस्पेसची सुरुवात 2015 साली झाली होती. या कंपनीने ड्रोन स्टार्टअप इकोसिस्टिमला प्रोत्साहन दिलं. आम्ही कमी बजेटमध्ये ड्रोन बेस्ट सोल्युशन उपलब्ध करुन देणार आहोत. गरुडने बनवलेल्या ड्रोन्सचा उपयोग कोविडच्या वेळी सॅनिटायजेशनसाठी मोठ्या प्रमाणावर झाला होता. बनारस, रायपूर, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरात औषधांच्या डिलिव्हरीसाठी या ड्रोन्सचा उपयोग झाला.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.