IPL 2021 पूर्वीच ख्रिस गेलचं अजब ट्विट, म्हणतो ‘मी निघालो पाकिस्तानला’

वेस्ट इंडिजचा धाकड खेळाडू ख्रिस गेल सध्या आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांसाठी युएईमध्ये आहे. तो पंजाब संघाकडून मैदानात उतरणार आहे. पण आयपीएलच्या सामन्यांपूर्वीच गेलने एक अजब ट्विट केले आहे.

IPL 2021 पूर्वीच ख्रिस गेलचं अजब ट्विट, म्हणतो 'मी निघालो पाकिस्तानला'
ख्रिस गेल

मुंबई: सध्या क्रिकेट जगतात पाकिस्तान क्रिकेट हा एक चर्चेचा विषय आहे. याच कारण न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) सामना सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना पाकिस्तानमधील दौरा रद्द करुन घरी परतण्याचा घेतलेला निर्णय. न्यूझीलंड संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानाच दौऱ्यासाठी आला होता. ते त्याठिकाणी तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार होते. अशावेळी पहिली वनडे मॅच सुरू होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना किवी संघाने दौराच रद्द केला. न्यूझीलंडच्या सुरक्षा यंत्रणानी सुरक्षेचे कारण देत असे करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्वामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. पण अशा सगळ्या परिस्थितीत क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने (Chris Gayle) मात्र पाकिस्तान क्रिकेटला आपले समर्थन देत एक अजब ट्विट केले आहे.

गेलने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करत लिहिलं आहे, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे. कोण कोण माझ्यासोबत येणार आहे?” गेल सध्या आयपीएलचे उर्वरीत सामने खेळण्यासाठी युएईत आहे. अशावेळी आय़पीएल सुरु होण्याच्या एकदिवस आधी म्हणजेच 18 सप्टेंबरला त्याने हे ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा झाली असून अनेकांनी यावर आपली मतं मांडली आहेत.

मोहम्मद आमिरने केलं स्वागत

गेलचं हे ट्वीट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिट्वीट करण्यात आलं आहे. यावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनेही आपली प्रतिक्एरिया देत, “तिथेच भेटू लेजेंड.” असं लिहिलं आहे.

गेलसह वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने देखील पाकिस्तानच्या समर्थनात ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं आहे की,”सकाळी उठताच मी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने सुरक्षेच्या कारणामुळे रद्द झाल्याची निराशाजनक बातमी मी ऐकली. पाकिस्तानचा दौरा हा माझ्या कारकिर्दीतील एक चांगला अनुभव होता. मला तिथे सुरक्षित वाटतं. त्यामुळे अशा बातमीने मला खरच झटका बसला आहे.”

हे ही वाचा 

आजपासून IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांचे रणशिंग फुंकले जाणार, युएईमध्ये सुरु होणार धमाकेदार सामने, सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर!

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

(Chris gayles Im going to Pakistan tomorrow who coming with me? tweet went viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI