AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“टी20 सामन्यात..”, कोच गॅरी कर्स्टनने अप्रत्यक्षरित्या कर्णधार शुबमन गिलला सुनावलं

शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत विजयी सुरुवात केली. मात्र चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

टी20 सामन्यात..,  कोच गॅरी कर्स्टनने अप्रत्यक्षरित्या कर्णधार शुबमन गिलला सुनावलं
शुबमन गिलला कोच गॅरी कर्स्टनकडून घरचा आहेर, स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Mar 30, 2024 | 7:28 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्सने विजयाने सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने सपशेल नांगी टाकल्याचं दिसून आलं. चेन्नई सुपर किंग्सने 63 धावांनी गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे गुजरात टायटन्सची घसरण थेट सातव्या स्थानावर झाली आहे. आता गुजरात टायटन्सचा तिसरा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी कर्णधार शुबमन गिल याची अप्रत्यक्षरित्या कानउघडणी केली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांचं मूल्यांकन करत खडे बोल सुनावले आहेत. टी20 सारख्या जलद फॉर्मेटमध्ये वेगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

“टी20 हा एक वेगवान खेळ आहे. त्यामुळे इथे पटापट धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. हे कसोटी क्रिकेटसारखं नाही. कसोटी निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो.”, असं गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं. दुसरीकडे त्यांनी शुबमन गिल याच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर गुजरात टायटन्सची जबाबदारी शुबमन गिलने व्यवस्थितरित्या सांभाळली आहे.

“मला वाटते की त्याने कर्णधारपद व्यवस्थितरित्या सांभाळलं आहे. नेतृत्व गुण बऱ्यापैकी सिद्ध करून दाखवलं आहे. तो हुशार आणि तरुण कर्णधार आहे.त्याच्याकडून टी20 क्रिकेटमध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. पुढे जाऊन बरंच काही शिकेल.”, असं गॅरी कर्स्टन म्हणाला. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 63 धावांनी झालेला पराभव जिव्हारी लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

“तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळी करायची असते. आम्ही त्या दिवशी खरंच हवं तसं खेळलो नाही. आम्ही ते स्वीकारलं आहे आणि पुढे काय करायचं याबाबत चर्चाही केली आहे. आम्ही खात्रीशीर पुढे जाऊन चांगली कामगिरी करू.”, असं गॅरी कर्स्टन यांनीही सांगितलं आहे.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बीआर शरथ.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.