सचिन तेंडुलकरकडून जय शाह यांचं अभिनंदन, म्हणाला, ती गोष्ट करुन दाखवली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जय शहा यांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने ट्विटरवर त्याचे अभिनंदन केले असून त्याच्यासाठी खास संदेशही लिहिला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय शहा यांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जय शहा यांची अध्यक्षपदी निवड होताच अनेक बड्या व्यक्तींनी त्यांचं अभिनंदन केले आहे. क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर एक लांबलचक संदेश लिहून जय शाह यांचे अभिनंदन केले आहे. सचिन तेंडुलकरने जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनल्याबद्दल एक खास ट्विट केले आहे.
सचिन तेंडुलकरने लिहिले की, उत्साही असणे आणि क्रिकेटसाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणे हे क्रिकेट प्रशासकासाठी आवश्यक गुण आहेत. जय शाह म्हणून त्याच्या कार्यकाळात ही गोष्ट आश्चर्यकारकपणे करुन दाखवली. BCCI सचिव महिला क्रिकेट आणि पुरुष क्रिकेट या दोहोंना प्राधान्य देण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे BCCI एक पायनियर बनले आहे ज्याचे अनुसरण इतर बोर्ड करू शकतात. मी त्यांना त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण ते सर्वात तरुण चेअरमन झाले आहेत. ICC चे नेतृत्व करण्यासाठी भारताने अनेक दिग्गजांना प्रशासक म्हणून पाठवले आहे: श्री जगमोहन दालमिया, श्री शरद पवार, श्री एन. श्रीनिवासन आणि श्री शशांक मनोहर. मला खात्री आहे की ते त्यांचा वारसा पुढे नेतील आणि क्रिकेटचा खेळ पुढे नेईल.
Being enthusiastic and having the drive to do something good for cricket are essential qualities for a cricket administrator. @JayShah displayed these traits wonderfully during his stint as @BCCI secretary.
His endeavours towards prioritising both women’s cricket and men’s…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 28, 2024
रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही केले अभिनंदन
भारताचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही जय शाह यांचे अभिनंदन केले आहे. रोहित शर्माने ट्विट करून लिहिले, जय शाह यांचे हार्दिक अभिनंदन. याशिवाय विराट कोहलीने ट्विटरवर लिहिले की, ‘आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जय शाह यांचे खूप खूप अभिनंदन. मी तुम्हाला पुढील यशासाठी शुभेच्छा देतो.
Many congratulations @JayShah on being elected as the ICC chairman. Wishing you great success ahead.
— Virat Kohli (@imVkohli) August 28, 2024
