भारतासाठी खेळला फक्त 10 टेस्ट, पण क्रिकेटमधून कमवतो दिवसाला 6-10 लाख रुपये

aakash chopra: जबरदस्त टॅलेंटे असल्यानंतर आकाश चोपडा भारतीय क्रिकेटसाठी जास्त सामने खेळू शकले नाही. परंतु आपली मेहनत आणि स्पेशल कमेंट्रीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. आकाश चोपडाकडे आज सर्व काही आहे.

भारतासाठी खेळला फक्त 10 टेस्ट, पण क्रिकेटमधून कमवतो दिवसाला 6-10 लाख रुपये
aakash chopra
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 2:16 PM

 cricket commentators salary: कधीकाळी भारतीय क्रिकेटमधील खेळाडूंना पैसा मिळत नव्हता. 1983 वर्ल्डकप विजेता खेळडूंना बक्षिस देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पैसा नव्हता. मग लता मंगेशकर यांचा कार्यक्रम घेऊन पैसे जमवण्यात आले. त्यानंतर खेळाडूंना बक्षिस देण्यात आले. परंतु आता 2024 मधील टी-20 वर्ल्डकप विजेता खेळाडूंना कोट्यवधीचे बक्षिस देण्यात आले. आता क्रिकेटमध्ये चांगला पैसा मिळू लागला आहे. आयपीएलमधून नवीन खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळत आहे. क्रिकेटमधील कमेंट्रीमधून माजी खेळाडू चांगलाच पैसा कमवत आहे. केवळ दहा कसोटी सामने खेळलेला माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा दिवसाला 6-10 लाख रुपये कमेंट्रीमधून कमवत आहे.

कमेंट्रीच्या जोरावर वेगळी ओळख

आकाश चोपडा क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला नाही. परंतु कमेंटेटर म्हणून सर्वच क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे. 19 सप्टेंबर 1977 रोजी जन्मलेला आकाश चोपडा आता 47 वर्षांचा झाला. दिल्लीचा क्लासिकल ओपनर आणि तंत्र कौशल्य असलेला खेळाडू म्हणून आकाश चोपडा ओळखला जात होता. जबरदस्त टॅलेंटे असल्यानंतर आकाश चोपडा भारतीय क्रिकेटसाठी जास्त सामने खेळू शकले नाही. परंतु आपली मेहनत आणि स्पेशल कमेंट्रीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. आकाश चोपडाकडे आज सर्व काही आहे.

आकाश चोपडाकडे किती आहे संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश चोपडाची एकूण संपत्ती अंदाजे 8 दशलक्ष डॉलर आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 64 कोटी रुपये आहे. आकाश चोपडाने ही संपत्ती त्याच्या क्रिकेट कॉमेंट्री, यूट्यूब चॅनल, बँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून मिळवली आहे. अलीकडेच एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत आकाश चोपडा याने भारतातील कंमेटेटरच्या पगाराबद्दल खुलेपणाने माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

एका सामन्यासाठी 6-10 लाख रुपये

मुलाखतीत कंमेटेटरच्या मानधनाबाबत आकाश चोपडा म्हणाला, मी कोणत्याही कंमेटेटरला त्याचा पगार विचारला नाही. परंतु माझ्या माहितीनुसार, नवीन कंमेटेटरची फी किमान 35 ते 40 हजार रुपये असू शकते. अनुभवी कंमेटेटरची फी प्रत्येक सामन्यात 6-10 लाख रुपये असू शकतो. जर एका वर्षात 100 सामने असतील तर अनुभवी क्रिकेट कंमेटेटर वर्षाला 10 कोटी रुपये कमवू शकतो. त्यामुळे आकाश चोपडाही एका सामन्यासाठी 6-10 लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.