AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Yadav : विजय यादव यांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआयकडून मदतीची शक्यता

1987 ते 1999 दरम्यानच्या त्यांच्या कारकिर्दीत 89 प्रथम श्रेणी सामने खेळले.  201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 3988 धावा केल्या आहेत.

Vijay Yadav : विजय यादव यांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआयकडून मदतीची शक्यता
भारताचे माजी क्रिकेटपटू विजय यादवImage Credit source: social
| Updated on: May 19, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू विजय यादव (Vijay Yadav) यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची नितांत आर्थिक मदतीची (financial help) गरज आहे. हेच नाही तर यादव यांना यापूर्वी दोन हृदयविकाराचे झटके आले आहेत. यादव गेल्या काही दिवसांपासून डायलिसिसवर आहेत. विजय लोकपल्ली (Vijay Lokapally) यांनी ट्विटरवरुन यादव यांच्या दुर्दशेकडं लक्ष वेधलं. यानंतर यादव यांना मदतीचा ओघ सुरू झाला. 1993मध्ये सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे षटक टाकावं, असं सुचवणारे यादव हेच होते, अस सांगून लोकापल्ली यांनी ट्विट केलंय की, ‘भारताच्या माजी यष्टीरक्षकाला मूत्रपिंड निकामी झाल्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. डायलिसिसवर आहे आणि दोन झटके आले आहेत.’ या ट्विटनंतर यादव यांना मदतीचा ओघ सुरू झाला.

विजय लोकपल्ली यांचं ट्विट

मदतीचे हात सरसावले

यादव यांच्या मदतीसाठी अनेक माजी क्रिकेटपटू पुढे आले आहेत. हरियाणा क्रिकेट असोसिएशनने त्याला आर्थिक मदत केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील यात पाऊल टाकू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

11 वर्षांची मुलगी गमावली

क्रिकेटरसाठी गेली काही वर्षे खूप त्रासदायक ठरली आहेत. 2006 मध्ये फरिदाबाद येथे झालेल्या एका कार अपघातात यादव क्रूरपणे जखमी झाले. तेव्हापासून ते त्यांच्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. या अपघातात त्यांनी त्यांची 11 वर्षांची मुलगीही गमावली.

3988 धावा केल्या

यादव यांनी एक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते एक यष्टिरक्षक आणि एक सुलभ फलंदाज आहे. 1993 मध्ये दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध त्याची एकमेव कसोटी खेळली होती. यादवला झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात दोन स्टंपिंगचे श्रेय मिळाले होते. आणि त्यांनी भारतीय डावात 25 चेंडूत 30 धावा केल्या, विनोद कांबळीने 301 चेंडूत 227 धावा केल्या होत्या. यादवने एकदिवसीय सामनेही खेळले. त्यांनी 118 धावा केल्या आणि त्याने 19 बाद (12 झेल आणि सात स्टंपिंग) केले. यादव यांनी डिसेंबर 1992 मध्ये ब्लूमफॉन्टेन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि नोव्हेंबर 1994 मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला. 1987 ते 1999 दरम्यानच्या त्यांच्या कारकिर्दीत 89 प्रथम श्रेणी सामने खेळले.  201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 3988 धावा केल्या आहेत. त्यांनी 237 झेल घेतले आहेत.

परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.