CSK vs RR : 4,4,4,4,4,4,4,4,6, आयुष म्हात्रेची वादळी खेळी, राजस्थान विरूद्धच्या सामन्यात ‘द्विशतक’ पूर्ण
Ayush Mhatre CSK vs RR IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा 17 वर्षीय बॅटिंग ऑलराउंडर आयुष म्हात्रे याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध झंझावाती खेळी केली. आयुषने या खेळीत चारही बाजूला फटके लगावत राजस्थानच्या गोलंदाजांना झोडून काढला.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थानने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनव्हे ही सलामी जोडी मैदानात आली. राजस्थानने चेन्नईला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. युद्धवीर सिंह याने चेन्नईच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नईला 2 झटके दिले. युद्धवीरने डेव्हॉन कॉनव्हे याला 10 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर उर्विल पटेलला भोपळाही फोडू दिला नाही. मात्र त्यानंतर आयुष म्हात्रे याने अनुभवी आर अश्विन याच्यासह जोरदार फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली.
उर्विल पटेल आऊट झाल्यानंतर चेन्नईची 2 ओव्हरनंतर 12 आऊट 2 स्थिती झाली. तेव्हा आयुषने टॉप गिअर टाकला. आयुषने कोणत्याही दबावात न राहता जोरदार फटकेबाजी केली. आयुषने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमध्ये चारही बाजूला फटके लगावले. त्यामुळे चेन्नईला 50 पार पोहचता आलं. आयुषने झंझावात कायम ठेवत चौकार-षटकार लगावणं सुरुच ठेवलेलं. मात्र मुंबईकर तुषार देशपांडे याने आयुषच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. तुषारने चेन्नईच्या डावातील सहाव्या ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर आयुषला क्वेना मफाका याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे आयुषची अर्धशतक करण्याची संधी हुकली.
आयुषने 215 च्या कडक स्ट्राईक रेटने 20 बॉलमध्ये 43 रन्स केल्या. विशेष म्हणजे आयुषने 43 पैकी 38 रन्स या चौकार आणि षटकारच्या मदतीने केल्या. आयुषने या खेळीत 8 चौकार आणि 1 सिक्स लगावला. आयुषने या खेळीसह 18 व्या मोसमात द्विशतकही पूर्ण केलं. आयुषने या हंगामातील 6 सामन्यांनंतर 200 धावांचा टप्पा पार केला.
आयुषची चाबूक खेळी
43 RUNS FOR AYUSH MHATRE FROM JUST 20 BALLS 👌
– He is continuing the dream form for Chennai Super Kings. pic.twitter.com/9RzQXdvy8e
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2025
अश्विन-जडेजा झटपट आऊट
आयुष म्हात्रे आऊट झाल्यानंतर पुन्हा चेन्नई एक्सप्रेस ट्रॅकवरुन घसरली. राजस्थानने चेन्नईला झटपट 2 झटके दिले. राजस्थानने आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी ऑलराउंडर जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.आर अश्विनने 13 धावा केल्या. तर जडेजा 1 रन करुन आऊट झाला.
जडेजा आऊट झाल्याने चेन्नईची 7.4 ओव्हरमध्ये 5 आऊट 78 अशी स्थिती झाली. त्यामुळे आता शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या जोडीवर चेन्नईची धुरा असणार आहे. त्यामुळे या जोडीकडून यला आर्मीला मोठ्या खेळीची आशा असणार आहे.