AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH IPL 2022: एमएस धोनी टॉस हरला, CSK चे दोन महत्त्वाचे खेळाडू अनफिट

CSK vs SRH IPL 2022: आयपीएलमधला हा 46 वा सामना आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर (MS Dhoni) असतील. कारण रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला.

CSK vs SRH IPL 2022: एमएस धोनी टॉस हरला, CSK चे दोन महत्त्वाचे खेळाडू अनफिट
CSK vs SRH
| Updated on: May 01, 2022 | 7:20 PM
Share

मुंबई: IPL 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (CSK vs SRH) सामना होत आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा डबल हेडरचा सामना आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होत आहे. आयपीएलमधला हा 46 वा सामना आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर (MS Dhoni) असतील. कारण रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला. पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे चेन्नईचं नेतृत्व आलं आहे. त्यामुळे धोनी आज कशी कामगिरी करतो, त्याच्या कॅप्टनशिपखाली आज चेन्नई जिंकते का? याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. दरम्यान एमएस धोनी नाणेफेकीचा कौल हरला आहे. सनरायजर्स हैदराबादच्या केन विलियमसनने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.  सीएसकेने आतापर्यंत आठ पैकी सहा सामने गमावले आहेत. फक्त दोन मॅचेसमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. प्लेऑफपर्यंत त्यांचा पोहोचण्याचा मार्ग खूपच खडतर आहे. त्यामुळे धोनी आज काही चमत्कार करतो का? याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

हैदराबाद संघाने एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर 3 सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये एकूण 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर नेट रेट 0.600 आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स पॉई्ट्स टेबलमध्ये नवव्या क्रामांकावर आहे.

CSK चे दोन महत्त्वाचे खेळाडू अनफिट

मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला होता. मात्र तरीही त्यांनी संघात बदल केलेला नाही. सीएसकेला त्यांच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानावर उतराव लागतय. ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे अनफिट आहेत.

SRH ची प्लेइंग – 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, टी.नटराजन, उमरान मलिक,

CSK ची प्लेइंग – 11 एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, ड्वेन कॉनवे, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी आणि महीश तीक्ष्णा,

4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.