AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4,4,4,4,4,4….198! दानिश मालेवर 35 चौकार मारत केल्या 100 हून अधिक धावा

दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरु झाली असून सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सेंट्र्ल झोनकडून खेळणाऱ्या दानिश मालेवरने शतकी खेळी केली. त्याच्या शतकाचं कौतुक होत आहे. त्याने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

4,4,4,4,4,4....198! दानिश मालेवर 35 चौकार मारत केल्या 100 हून अधिक धावा
4,4,4,4,4,4....100! दानिश मालेवर 35 चौकार मारत केल्या 100 हून अधिक धावाImage Credit source: Danish Malewar Official Account/ Instagram
| Updated on: Aug 28, 2025 | 5:22 PM
Share

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 21 वर्षीय दानिश मालेवरने जबरदस्त खेळी केली. त्याच्या या खेळीची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व फेरीत सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. यात सेंट्रल झोनच्या दानिश मालेवरने नॉर्थ ईस्ट झोनच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात दानिश मालेवर द्विशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दानिश मालेवरने 218 चेंडूचा सामना 35 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 198 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 90.83 चा आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात त्याचं द्विशतक पूर्ण होईल असंच वाटत आहे. दानिश मालेवरने या खेळीत 35 चौकार आणि 1 षटकार मारला. म्हणजेच 146 धावा फक्त चौकार आणि षटकारानेच पूर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेंट्रल झोनने 77 षटकात 2 गडी गमवून 432 धावा केल्या. त्यामुळे नॉर्थ ईस्टच झोनवर पहिल्याच दिवशी दबाव वाढला आहे. पण हा दानिश मालेवर आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत…

कोण आहे दानिश मालेवर?

दानिश मालेवरचा जन्म नागपूरमध्ये 8 ऑक्टोबर 2003 रोजी झाला. तो विदर्भ संघासाठी खेळतो आणि फर्स्ट क्लास डेब्यू त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध नागपूरमध्ये केलं. त्याने दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 61 धावा केल्या. तसेच पुढच्या तीन डावात दोन अर्धशतकं ठोकली. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातविरुद्ध नागपूरमध्येच पहिलं शतक ठोकलं होतं. रणजी स्पर्धेत दानिश 9 सामन्यातील 15 डावात 52.20 च्या सरासरीने आणि 51.34 च्या स्ट्राईक रेटने 783 दावा केल्या होत्या. यावेळी त्याने 95 चौकार आणि 6 षटकार मारले. यात दोन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा हा फॉर्म दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही कायम आहे. आता द्वीशतक ठोकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ही कामगिरी करू शकतो.

दानिशने आतापर्यंत एकही लिस्ट ए किंवा टी20 सामना खेळलेला नाही. पण या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याची फलंदाजी पाहता लवकरच या फॉर्मेटमध्ये खेळताना दिसू शकतो. दरम्यान, दानिशच्या वडिलांनी त्याच्या जन्मापूर्वी क्रिकेट करिअर ठरवून टाकलं होतं. कारण दानिशचे वडील क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांनी लग्नापूर्वीच ठरवलं होतं की मुलगा झाला तर त्याला क्रिकेटपटू बनवणार. आता दानिश त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असंच दिसत आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....