AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PKL 2025 : वैभव सूर्यवंशीची प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एन्ट्री, झालं असं की…

प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या 12व्या पर्वाचे वेध लागले आहेत. ही स्पर्धा 29 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. गेल्या काही वर्षात प्रो कबड्डी लीग स्पर्धेला ग्लॅमर मिळालं आहे. आता 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची या स्पर्धेत एन्ट्री होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

PKL 2025 : वैभव सूर्यवंशीची प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एन्ट्री, झालं असं की...
PKL 2025 : वैभव सूर्यवंशीची प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एन्ट्री, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 4:22 PM
Share

भारतीय क्रिकेटविश्वात सध्या वैभव सूर्यवंशीचं नाव चांगलंच गाजत आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच आपल्या फलंदाजीने नावलौकिक मिळवला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने दिग्गज गोलंदाजांना फोडून काढलं होतं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. आता वैभव सूर्यवंशी प्रो कबड्डी स्पर्धेत दिसणार आहे. त्याला प्रो कबड्डी लीगच्या 12व्या पर्वासाठी बोलवलं आहे. वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. 29 ऑगस्ट 2025 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तेव्हा वैभव सूर्यवंशी दिग्गज खेळाडूंसोबत दिसणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या पर्वात बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, कबड्डी स्टार प्रदीप नरवाल आणि टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशी दिसणार आहे. यापूर्वी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी दिग्गज खेळआडूंनी स्पर्धेचं लाँचिंग केलं आहे.

प्रो कबड्डी लीगचा पहिला सामना तेलुगु टायटन्स आणि तामिळ थलाइवाज यांच्यात खेळला जाईल. या कार्यक्रमापूर्वी वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितलं की, नॅशनल स्पोर्ट्स डे मला आठवण करून देतो की खेळ सर्वांना एकत्र आणतो. खेळ तुम्हाला टीमवर्क, शिस्त शिकवतो. राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला विश्वास आहे की, माझ्यासारखी आणखी मुले खेळायला सुरुवात करतील.

प्रो कबड्डी लीग स्पर्धा देशातील चार शहरांमध्ये खेळली जाणार आहे. विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली येथे सामने खेळवले जातील. या पर्वात स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच सर्व सामन्यांचे निकाल स्पष्टपणे येणार आहे. कारण साखळी फेरीतही ट्रायब्रेकर ते ड्रॉ सामन्यांचे निकाल स्पष्ट केलं जातील. तर साखळी फेरीत आणि प्लेऑफमध्ये एक प्ले इन टप्पा सुरु केला आहे. यात टॉपचे संघ सरळ पात्र होतील. पण तिसऱ्या चौथ्या स्थानावरील संघ मिनी क्वॉलिफायरसोबत भिडतील. पाचव्या ते आठव्या क्रमांकाचे संघ प्ले-इन टप्प्यात जाण्यासाठी लढतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.