AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs SRH IPL 2022: David Warner ने आज अपमानाचा बदला घेतला, SRH ला दणका दिला

DC vs SRH IPL 2022: डेविड वॉर्नरच्या T 20 करीयरमधली ही 89 वी फिफ्टी आहे. त्याने टी 20 चा एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. T 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अर्धशतक आता वॉर्नरच्या नावावर जमा आहेत.

DC vs SRH IPL 2022: David Warner ने आज अपमानाचा बदला घेतला, SRH ला दणका दिला
david-warner Image Credit source: ipl/twitter
| Updated on: May 05, 2022 | 11:01 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आजच्या 50 व्या सामन्यात डेविड वॉर्नरचा (David Warner) जलवा पहायला मिळाला. वॉर्नरने आपली जुनी टीम सनरायजर्स हैदराबादचा (SRH) आपल्या खास शैलीत समाचार घेतला. त्याने 58 चेंडूत 92 धावा चोपून काढल्या. यात 12 चौकार आणि तीन षटकार आहेत. IPL 2022 मध्ये वॉर्नरच हे चौथ अर्धशतक आहे. डेविड वॉर्नरने तर सनरायजर्स हैदराबाद (SRH) बरोबरचा आपला जुना हिशोब चुकता केला. वॉर्नरच्या बॅटिंगमध्ये आज एक निश्चय दिसला. वॉर्नरने SRH च्या फ्रेंचायजीबरोबर सोशल मीडियावर पंगे घेतले होते. आज वॉर्नरने आपल्या बॅटिंगने तो सर्व हिशोब चुकता केला. त्याने एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. डेविड वॉर्नरच्या खेळात आज एक वेगळी चमक दिसली. त्याला रोखणं SRH च्या कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही.

विराट कोहली तिसऱ्या स्थानावर

डेविड वॉर्नरच्या T 20 करीयरमधली ही 89 वी फिफ्टी आहे. त्याने टी 20 चा एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. T 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अर्धशतक आता वॉर्नरच्या नावावर जमा आहेत. त्याने वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिल गेलला मागे टाकलं आहे. गेलच्या खात्यात 88 हाफ सेंच्युरी आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 77 अर्धशतकासह वॉर्नर आणि गेलच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे.

वॅटसन-फिंचच्या क्लबमध्ये वॉर्नर

डेविड वॉर्नरने या शानदार खेळीसह टी 20 क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. वॉर्नरच्या आधी शेन वॉटसन (467) आणि एरॉन फिंचच्या खात्यात (426) षटकार जमा आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत 463 टी 20 सामन्यात 1056 षटकार ठोकले आहेत.

6.25 कोटीमध्ये विकत घेतलं होतं

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. वॉर्नरला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनेही रस दाखवला होता. वॉर्नर याआधी सनरायजर्स हैदराबादकडून खेळायचा.

सनरायजर्सने वॉर्नरला हटवलं होतं

मागच्यावर्षी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात वॉर्नरने खराब प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर त्याला कॅप्टनशिपवरुन हटवलं होतं. त्यावेळी केन विलियमसनला टीम मॅनेजमेंटने कॅप्टन बनवलं. टॉम मुडी आणि डेविड वॉर्नरमध्ये पटत नसल्याच्या त्यावेळी बातम्या आल्या होत्या. 2021 चा सीजन सोडल्यास वॉर्नरने प्रत्येक मोसमात SRH साठी 500 पेक्षा जास्त धावांच योगदान दिलं होतं.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.