DC vs KKR, IPL 2022: ऋषभची स्पायडरमॅन कॅच आणि उमेशचा डायव्हिंग झेल चुकवू नकाच, Must Watch VIDEO

DC vs KKR, IPL 2022: कोलकाताच्या डावात 14 व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. समोर स्ट्राइकवर श्रेयस अय्यर 42 धावांवर खेळत होता.

DC vs KKR, IPL 2022: ऋषभची स्पायडरमॅन कॅच आणि उमेशचा डायव्हिंग झेल चुकवू नकाच, Must Watch VIDEO
DC vs KKRImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 11:04 PM

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) कॅप्टन ऋषभ पंतवर (Rishabh Pant) मागच्या सामन्यात बरीच टीका झाली होती. फलंदाजी किंवा यष्टीरक्षणातील कमतरतेसाठी त्याला कोणी काही बोललं नव्हतं. पण कॅप्टन म्हणून त्याने केलेली कृती कोणालाही पटली नव्हती. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात हा सर्व प्रकार घडला होता. त्याने No-ball वरुन क्रीझवर असलेल्या कुलदीप यादव आणि रोव्हमॅन पॉवेलला माघारी बोलावलं होतं. त्यामुळे मागच्या सामन्यात ऋषभला बरचं ट्रोल करण्यात आलं होतं. पण आज त्याने यष्टीपाठी जबरदस्त कामगिरी केली. आज ऋषभने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरचा अप्रतिम झेल घेतला. ऋषभने घेतलेल्या या कॅचला तोड नाहीय. त्याच्या कॅचने अनेकांना हैराण करुन सोडलं.

चेंडू खूप खाली राहिला, पण…

कोलकाताच्या डावात 14 व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. समोर स्ट्राइकवर श्रेयस अय्यर 42 धावांवर खेळत होता. कुलदीपचा पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. श्रेयसने हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने खेळण्यााच प्रयत्न केला. पण चेंडूने बॅटच्या खालच्या भागाची कड घेऊन तो पंतकडे गेला.

चेंडू खूप खाली राहिला. पण ऋषभने एकाहाताने कॅच घेतली. बॅलन्स करताना तो मागे पडला. पण कॅच सोडली नाही. पंतने बॉल जमिनीला टेकवला तर नाही ना, याची खातरजमा केल्यानंतर पंचांनी श्रेयसला बाद दिलं. हा या स्पर्धेतीत स्टम्प्सपाठी घेतला गेलेला एक सर्वोत्तम झेल आहे.

ऋषभची स्पायडरमॅन कॅच MISS करु नका, इथे क्लिक करा  

उमेश यादवने बनवलेली कॅच एकदा पहाच 

क्या बात हैं उमेश यादव

उमेश यादवने आज एक उत्कृष्ट झेल घेतला. महत्त्वाचं म्हणजे दिल्ली कॅपिटल्सला त्याने पहिल्या चेंडूवर दणका दिला. त्याने सलामीवीर पृथ्वी शॉ गोल्डन डकवर बाद केलं. वेगात धावत आलेल्या उमेशने चेंडू टाकला. त्यानंतर पृथ्वीच्या बॅटला लागून उडालेला झेल उमेशने डाइव्ह मारुन टिपला. दिल्लीची खूप खराब सुरुवात झाली. केकेआरने दिल्लीला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिलं आहे. पण सध्या 90 रन्समध्ये त्यांच्या पाच विकेट गेल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.